सुधाकर बडगुजरांचे सलीम कुत्तासोबत संबंध…CM फडणवीसांनी काय सांगितलं?

Cm Devendra Fadanvis On Sudhakr Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakr Badgujar) यांनी काल मुंबईत भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलायं. या प्रवेशानंतर विरोधकांकडून भाजप नेत्यांनी केलेल्या गंभीर आरोपांची आठवण करुन दिली. या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांना सवाल विचारण्यात आल्यानंतर फडणीसांनीही सॉफ्ट कॉर्नर दिलायं. सुधाकर बडगुजरांवर चौकशीअंती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
फरहानच्या ‘लक्ष्य’ने गाठलं 21 वं वर्ष : एका तरुणाच्या आत्मशोधाची सैनिक बनण्याची प्रेरणादायी कहाणी
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुधाकर बडगुजर यांच्याबाबतचा एक व्हिडिओ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समोर आणला होता. त्यानंतर बडगुजर यांची एसआयटी चौकशी झाली. या चौकशीअंती त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यावेळी ते ठाकरे गटात होते. आता त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा दर्शवली त्यामुळे कोणी पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्य सरकारकडून मराठी जणांची फसवणूक; हिंदी भाषा सक्तीचीच, पाहा कसं ठेवलं तुम्हाला अंधारात?
तसेच नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत आमच्या विरोधातील उमेदवार सुधाकर बडगुजर होते. त्यांनी निवडणुकीत भरपूर मते घेतलेली आहेत. ते ठाकरे गटात असतानाच त्यांची चौकशी झाली होती. या चौकशी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांचा जुना इतिहास वागण्याची पद्धती हे बाजूला ठेऊन आता भाजपच्या नीतीनियमांनी त्यांनी वागलं पाहिजे. आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजनांवर दिली होती. बावनकुळेंना याबाबतची कल्पना नव्हती. विसंवाद झाला असेल पण कोणाचाही विरोध नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
समाज सुधारण्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही महत्वाचे : जान्हवी धारीवाल बालन यांचे प्रतिपादन
काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊस इब्राहिमचा साथीदार असलेला सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हायरल झाले होते. बडगुजर यांचे कुत्तासोबत संबंध असल्याचा थेट आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावेळी बडगुजर हे उद्धव ठाकरे गटात होते. पक्षफुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहिले. पण पक्षात सन्मान होत नसल्याचा आरोप करीत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलायं. त्यांनी आता आपल्या हाती कमळ घेतलंय.
बडगुजर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान, अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळाल्या आहेत. सुरुवातीला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ही दुपारी 2 वाजताची देण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार मंत्री गिरीश महाजनांसह इतर भाजप नेते कार्यालयात पोहोचले खरे पण चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे पोहोचलेच नाहीत. अखेर अनेकांना फोन केल्यानंतर बावनकुळे आणि चव्हाण हे पक्ष कार्यालयात आले. आज पक्षप्रवेश होणार याची कल्पना नव्हती आम्हाला वाटलं उद्या प्रवेश होणार या शब्दांत बावनकुळे यांनी आल्यानंतर सारवासारव केली.