Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात बिबट्याचं (Leopard) दर्शन झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत एकावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा बिबट्या मागील एक महिन्यांपासून श्रीरामपुरात धुमाकूळ घालत होता, अखेर त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे.
Government Schemes : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येईल?
शहर व तालुक्यात बिबट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील शिरसगाव हद्दीमध्ये अशाच प्रकारे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात काल (ता.४) रात्री वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जानकारांना सोबत घेणार, माढा सोडणार… पवार-ठाकरे साधणार पाच समीकरणे
तालुक्यात फिरत असलेला हा बिबट्या जेरबंद झाला असला तरीही अद्यापही या परिसरात एक बिबट्या असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
श्रीरामपुरातील शिरसगाव भागात गेल्या महिनाभरापासून दोन बिबट्यांचा वावर होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत होती.
जादा परताव्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा गंडा, एजंट पैसे घेऊन पसार, गुंतवणूकदारांमध्ये घबराट
पिंजरा लावण्याची वनविभागाकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. चांगदेव बकाल व किशोर बकाल यांच्या उसाच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावला होता. त्यामध्ये बिबट्यासाठी भक्ष ठेवण्यात आले हाते. या भक्षाच्या नादात बिबट्या काल सोमवारी (ता.४) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात अलगद अडकला आहे.