न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार, मतदारसंघही फायनल

न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार, मतदारसंघही फायनल

Abhijit Gangopadhyay : कोलकाता उच्च न्यायालयाचे (Calcutta High Court) न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर कोलकाता येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, 7 मार्च रोजी दुपारी एक कार्यक्रम आयोजित केला आहे, यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अभिजित गंगोपाध्याय म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरुद्ध फक्त भाजपच लढू शकते. तत्पूर्वी, न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. त्याची प्रत देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टीएस शिवगनम यांना पाठवली आहे.

Lok Sabha 2024 : उत्तरेत भाजप, दक्षिणेत विरोधक स्ट्राँग; ‘दक्षिण दिग्विजय’ भाजपसाठी यंदाही कठीणच

न्यायमूर्ती गंगोपाध्याय पश्चिम बंगालमधील तमलूक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. तमलूकची सीट जागा काही निवडणुकीपासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 2009 पासून ही जागा टीएमसी सतत जिंकत आहे.

बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता. अधिकारी तेव्हा टीएमसीचे नेते होते. टीएमसी सोडल्यानंतरही 2016 च्या पोटनिवडणुकीत टीएमसीचा उमेदवार येथून विजयी झाला होता. 2009 ते 2016 या काळात सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे उजवे हात असल्याचे बोलले जात होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube