T20 WORLD CUP: भारत-पाकिस्तान महामुकाबला, एका तिकिटासाठी मोजावे लागतायत 1.86 कोटी

T20 WORLD CUP: भारत-पाकिस्तान महामुकाबला, एका तिकिटासाठी मोजावे लागतायत 1.86 कोटी

T20 World Cup 2024 : आता ICC T20 विश्वचषक (T20 World Cup) सुरु होण्यासाठी फक्त 3 महिने उरले आहेत, पण भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यातील महामुकाबल्याची उत्सुकता आतापासूनच सुरू झाली आहे. अमेरिकेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, क्रिकेटच्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

एका अमेरिकन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भारताच्या 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान आणि 15 जून रोजी फ्लोरिडामध्ये कॅनडा विरुद्धच्या दोन्ही सामन्यांची तिकिटे विकली गेली आहेत. आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तिकीट विकले गेले आहे.

आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्याची तिकिटे StubHub आणि SeatGeek सारख्या वेबसाइटवर ब्लॅकमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, मूळ किमतीच्या दुप्पट दराने तिकीटे विकले जात आहेत. काही तिकिटांची किंमत 1.86 कोटींवर पोहोचली आहे.

Lok Sabha 2024 : उत्तरेत भाजप, दक्षिणेत विरोधक स्ट्राँग; ‘दक्षिण दिग्विजय’ भाजपसाठी यंदाही कठीणच

आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तिकीट विक्रीची घोषणा करण्यात आली होती. ICC च्या वेबसाइटवर सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत 497 रुपये होते, तर सर्वात महाग तिकिटाची किंमत कर शिवाय 33,148 रुपये होते. तिकिट विक्री सुरु होताच काही वेळात सर्व तिकिटे विकली गेली. ज्या लोकांनी तिकीट खरेदी केले होते ते लोक आता वेगवेगळ्या वेबसाइट्सद्वारे तिकीटांची पुन्हा विक्री करत आहेत.

पुन्हा विक्री होत असलेल्या व्हीआयपी तिकिटांची किंमत सुमारे 33.15 लाख रुपयांवर पोहोचली आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर तिकीट उपलब्ध आहे त्या प्लॅटफॉर्मचे शुल्कही जोडले तर त्याची किंमत सुमारे 41.44 लाख रुपये होते. भारत-पाकिस्तान सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट StubHub वर 1.04 लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर SeatGeek वर सर्वात महाग तिकीट प्लॅटफॉर्म शुल्कासह 1.86 कोटी रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

अनंत अंबानींचं प्री-वेडिंग भाजप-ठाकरेंचं करणार पॅचअप?; अमृता फडणवीसांचा ठाकरे परिवारासोबत एकत्रित प्रवास

22 फेब्रुवारीपासून तिकीट विक्री सुरू झाली
ICC T20 विश्वचषकासाठी तिकीट विक्रीचा पहिला टप्पा 22 फेब्रुवारीला सुरु झाला होता. यापूर्वी, सर्वसामान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली होती, यामध्ये काही निवडक सामन्यांची तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जात होती. मात्र अवघ्या 10 दिवसांत ही तिकिटे पुनर्विक्रीच्या वेबसाइटवर पोहोचली. विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मागणी वाढली आहे. तिकीटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आता या किमती NBA आणि मेजर लीग बेसबॉल सारख्या लीगच्या बरोबरीच्या झाल्या आहेत.

Kanni Song: मैत्रीचा अर्थ `यारा रे’ सांगणार, ‘कन्नी` चित्रपटाचे दुसरे साँग रिलीज

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज