अनंत अंबानींचं प्री-वेडिंग भाजप-ठाकरेंचं करणार पॅचअप?; अमृता फडणवीसांचा ठाकरे परिवारासोबत एकत्रित प्रवास

अनंत अंबानींचं प्री-वेडिंग भाजप-ठाकरेंचं करणार पॅचअप?; अमृता फडणवीसांचा ठाकरे परिवारासोबत एकत्रित प्रवास

Anant Radhika Pre Wedding : अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रेटी (Anant Radhika Pre Wedding) मंडळींनी जामनगरला हजेरी लावली.  या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी चक्क एकाच विमानाने जामनगर गाठले. राजकारणात दोन्ही कुटुंबात निर्माण झालेला दुरावा, एकमेकांवर होणारी टीका पाहिली तर हा प्रसंग चर्चेचा ठरला.

अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबियांनी एकाच विमानाने प्रवास करत अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली.  यामुळे आता दोन्ही कुटुंबांतील मनभेद मिटले का?, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का?, त्यासाठी हा जामनगरचा दौरा निमित्त ठरणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

या प्रसंगाची स्टोरी सुद्धा खास आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री वेडिंग जामनगर येथे पार पडलं. यावेळी मोठे राजकीय नेते, सेलिब्रिटी मंडळी या कार्यक्रमाला हजर राहिले. ठाकरे कुटुंबियही या सोहळ्याला उपस्थित होतं. मुंबईवरून जामनगरला जे विमान गेलं त्याच विमानात ठाकरे कुंटुंबीय आणि अमृता फडणवीस या देखील होत्या.

Amruta Fadnavis यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं पडलं महागात; CA ला ठोकल्या बेड्या

29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमृता फडणवीस जामनगरला निघाल्या होत्या. त्याचवेळी ठाकरे कुटुंबियही निघाले होते. अमृता फडणवीस यांच्यासाठी जे विमान होतं त्यात त्यांच्याकडील सामान ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागणार होता. पण, दुसरं विमान जे होतं ते ठाकरे कुटुंबियांचं होतं.

यावेळी अमृता फडणवीस यांनी विमानतळ एव्हिएशनला विनंती केली की जे विमान उपलब्ध असेल त्या विमानाने जामनगरला जाऊ द्या . त्यानंतर एव्हिशनने कळवले की आम्हाला आधी ठाकरे कुटुंबियांची परवानगी घ्यावी लागेल. यानंतर एव्हिएशनने ठाकरे कुटुंबियांची परवानगी मागितली त्यावेळी त्यांच्याकडून कोणताही नकार आला नाही. या विमानात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे होत्या.

तसं पाहिलं तर, अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबियांवर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही अमृता फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली होती. परंतु आता ठाकरे कुटुंबीय आणि फडणवीस यांच्या एकत्रित विमान प्रवासाने ही राजकीय कटुता मिटली का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

Amruta Fadanvis : प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस एकमेंकीवर तुटून पडल्या, थेट ‘औकात’च काढली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज