Amruta Fadnavis यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं पडलं महागात; CA ला ठोकल्या बेड्या

Amruta Fadnavis यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं पडलं महागात; CA ला ठोकल्या बेड्या

Amruta Fadnavis : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं एका CA ला चांगलंच महागात पडलं आहे. अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्वीटवर छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar)शहरामधील एका सीएने (CA)आक्षेपार्ह कमेंट केली. ही बाब लक्षात येताच शहरामधील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्या सीएला ताब्यात घेतले आहे. अतिष ओमप्रकाश काबरा (वय 35, रा. नरहरी वसंत विहार, न्यू एसबीएएच कॉलनी, ज्योतीनगर) असे त्या आरोपीचे नाव आहे.(chhatrapati sambhajinagar amruta-fadnavis tweet on offensive comment arrested CA Atish kabra)

NCP : पुन्हा भाकरी फिरणार? अजितदादांची आमदारांसोबत बैठक तर शरद पवारांची वरिष्ठ नेत्यांशी खलबत

अमृता फडणवीस यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नुकतेच अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्वीटवर छत्रपती संभाजीनगर येथील एका सीएने आक्षेपार्ह कमेंट केली होती. आता ही कमेंट त्याच्या अंगलट आल्याची दिसत आहे.

नगरच्या 300 युवकांचं पंढरपुरात स्वच्छता अभियान; तरुणांकडून पांडुरंगाची अनोखी सेवा

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांचे चांगले फॉलोवर्स आहेत. अमृता फडणवीस अनेक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असतात. बहुतेकवेळा अमृता फडणवीस यांच्या पोस्टची माध्यमांमधून दखल घेतली जाते. तर त्यावरुन अमृता फडणवीस अनेकदा ट्रोल होत असतात. बऱ्याचदा त्यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंटही पाहायला मिळत असतात.

मध्यान्ह भोजनातून 21 विद्यार्थ्यांना विषबाधा; नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या हे प्रकरण लक्षात आल्यानंतर याची माहिती त्यांनी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांना कळवली कळवण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी आरोपी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध लावला आहे. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच भाजप महिला शहराध्यक्ष अमृता पोलोदकर यांच्या फिर्यादीवरुन अतिषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या माहितीनुसार 30 जूनला अमृता फडणवीस यांच्या ट्वीट पोस्टवर सीए अतिषने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर हा प्रकार भाजप पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्याच्या प्रविणा यादव यांनी आरोपी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube