NCP : पुन्हा भाकरी फिरणार? अजितदादांची आमदारांसोबत बैठक तर शरद पवारांची वरिष्ठ नेत्यांशी खलबत

NCP : पुन्हा भाकरी फिरणार? अजितदादांची आमदारांसोबत बैठक तर शरद पवारांची वरिष्ठ नेत्यांशी खलबत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होत नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार आणि समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्षपदाचे चित्र अस्पष्ट असल्याने राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांना भेटायला जाणार आहेत. आज (2 जुलै) राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थर आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक होणार आहे. मुंबई येथील निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. (NCP leader Ajit Pawar held meeting in mumbai with MLA and ncp district president)

विरोधी पक्ष नेतेपदावरुन मुक्त करुन पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याची मागणी केल्यानंतर अजित पवार यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अद्यापही वेट अॅन्ड वॉच हाच मेसेज देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अजित पवार यांचा गट नाराज असल्याच्या चर्चा आहे. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी 5 वर्षांहुन अधिक काळ झाला आहे. त्यामुळे त्यांनीही याबाबत भाष्य करत नवीन जबाबदारी देण्याची अप्रत्यक्षरित्या मागणी केली होती.

Buldhana : भीषण अपघाताचे कनेक्शन यवतमाळच्या पोलीस उपनिरीक्षकापर्यंत; काय आहे प्रकरण?

6 जुलैला शरद पवारांची बैठक :

दरम्यान, अजित पवार यांच्या मागणीनंतर शरद पवार यांनी येत्या 6 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांशी शरद पवार चर्चा करणार आहेत. अजित पवार यांनी पक्षात जबाबदारी द्यावी ही मागणी केल्यानंतर पहिली बैठक होणार आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पक्षात चर्चा करून निर्णय होईल, असं पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

हिंगोलीसाठी ठाकरेंची रणनीती ठरली? काँग्रेसचा दावा खोडून काढण्यासाठी स्थानिक उमेदवाराचे नाव चर्चेत

काय म्हणाले होते अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करेन, यासाठी विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, संघटनेच्या कामाचा मला अनुभव आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मी ऐनवेळी अनेकांना आमदारकीची उमेदवारी दिली, ते सर्वजण निवडून आले. आता मला संघटनेत कोणतही पद द्या त्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल, असेही त्यांनी बोलून दाखविले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube