Amruta Fadanvis : प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस एकमेंकीवर तुटून पडल्या, थेट ‘औकात’च काढली
Amruta Fadanvis-Priyanka Chaturvedi Twitter War : अमृता फडणवीस यांना एका महिलेने 1 कोटी रुपयांची लाच देण्याच प्रयत्न केला आहे. यानंतर त्यांनी मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. अनिक्षा असे त्या महिला डिझायनरचे नाव आहे. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी व अमृता फडणवीस यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी आधी ट्विट करत अमृता फडणवीसांवर या प्रकरणावरुन निशाणा साधला आहे. एका गुन्हेगाराची मुलगी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या संपर्कात येते. गेल्या पाच वर्षांपासून ती महिला त्यांची मैत्रीण आहे, याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: विधानसभेत दिली आहे. त्या महिलेने अमृता यांना कपडे, दागिने प्रमोशन करण्यासाठी दिले. ती महिला त्यांच्यासोबत गाडीमध्ये फिरत होती. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या आहेत.
एक कोटींचं लाच प्रकरण नेमकं काय? फडणवीसांकडून संपूर्ण घटनेचा उलगडा
यावर अमृता फडणवीस यांनी देखील उत्तर दिले आहे. मी अॅक्सिस बँकेत होते तेव्हा देखील मी बँकेकडून फायदे घेतल्याचा आरोप तुम्ही केला होता. आता तुम्ही माझ्या प्रामाणिकतेवर संशय घेत आहात. अर्थात, जर तुमचा विश्वास संपादन केल्यावर जर तुमच्याकडे कोणी गुन्हा मिटवण्यासाठी मदत मागितली असती तर तुम्ही ती केली असती हीच तुमची औकात आहे, अशा शब्दात अमृता फडणवीसांनी चतुर्वेदींवर निशाणा साधला आहे.
I know ur औक़ात is about switching masters & pulling down honest & independent women.
Why do u need to ask Miss चतुर pokey nose for an independent investigation-I’m myself demanding for it. Let the truth reg deceit come out to light along with real faces behind this treachery https://t.co/GbbmwsTl5R— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 16, 2023
यानंतर प्रियंका यांनी पुन्हा उत्तर दिले आहे. एका डिझायनरकरकडून प्रमोशनसाठी कपडे घेण्याची माझी औकात नाही. स्वतंत्र चौकशीचा तुम्हाला एवढा त्रास का होत आहे. ज्या दिवशी तिने तुम्हाल पैसे मिळवण्याच्या टिप्स दिल्या त्याच दिवशी तुम्ही तिची तक्रार करायला पाहिजे होती, असे त्यांनी म्हटले आहे. यावरुन पुन्हा अमृतांनी निशाणा साधला आहे.
मला माहित आहे की तुमची औकात ही मास्टर्स बदलणे व स्वतंत्र आणि प्रामाणिक महिलांना खाली खेचणे आहे. मी स्वत: या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तपासातून यामागे कुणाचा चेहरा आहे ते समोर येईल, असे अमृता म्हणाल्या आहेत