Download App

CM फडणवीसांनी शब्द पाळला! कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी…

८ वर्षांपूर्वी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis attends wedding of victim sister Kopardi : सुमारे आठ वर्षांपूर्वी कोपर्डी (Kopardi) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रभर अनेक मोर्चे आणि आंदोलने झाली. यानंतर न्यायालयाने अखेर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान, महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्षे पूर्ण झाली. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या  लग्नाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.

बांगलादेश दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन! भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद 

कोपर्डी (ता.कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे हा विवाह सोहळा पार पडला. कोपर्डीतील पीडितेच्या वडिलांचा फडणवीस यांच्याशी घटनेपासून कायम संपर्क राहिला आहे. त्यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते.फडणवीस यांनी लग्नाला यायचंही कबूल केलं होतं. दोन दिवसांपूर्वी फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार होती घेतला. मात्र, त्यांनी लग्नाला येण्याचे वचन पाळले. एका छोटय़ाशा गावात साध्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा संदेश दिला.

Redmi Note 14 सिरीज उद्या लॉन्च होणार; वॉटरप्रुफ बॉडी अन् भन्नाट कॅमेरा फिचर्स 

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, या लग्नासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले होते, त्यामुळे आम्ही येथे आलो आणि वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही कुटुंबांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं फडणवीस म्हणाले.

यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर, पोपटराव गावडे यांच्यासह भाजपचे नगर आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी देखील लग्नाला उपस्थित होते.

13 जुलै 2016 रोजी कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना त्यावेळी खूप गाजली होती. संपूर्ण राज्यात वातावरण तापले होते. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 29 नोव्हेंबर 2017 रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. मात्र मधल्या काळात मुख्य आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली.

follow us