अहमदनगर – लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांचे (Vidhansabha Election) वेध लागले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) पक्षांकडून विधानसभेची चाचपणी सुरु झाली आहे. अशातच नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसने देखील लक्ष घातले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
विम्बल्डन महिलांच्या फायनलमध्ये Sonam Kapoor चा जलवा! स्टायलिश ड्रेसमध्ये वेधलं लक्ष
येत्या 13 ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने काँग्रेसचे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नगर दौऱ्यावर येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली आहे.
लोकसभेनंतर विधासभेतही महायुतीसाठी धोक्याची घंटा; मुंबईचा कौल ‘मविआ’च्या बाजूने?
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आता आघाडीकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यातच आघाडीमधील घटकपक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. यातच राज्यात चर्चेत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात मविआची काय रणनीती असणार? तसेच कोणत्या पक्षाला कोण कोणत्या जागा मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने हालचालींना वेग आला आहे. नगर जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अत्यंत बारकाईनं लक्ष आहे. आता त्यापाठोपाठ काँग्रेस देखील या ठिकाणी आपली ताकद आजमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने येत्या 13 ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने काँग्रेसचे राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव आणि काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले हे नगर दौऱ्यावर येणार आहे.
13 ऑगस्टला सकाळी 11 वाजता चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ते अभिवादन करणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता नगर शहरात पत्रकार परिषद घेऊन नगर विधानसभा मतदारसंघाबाबत भाष्य करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली आहे.