लोकसभेनंतर विधानसभेतही महायुतीसाठी धोक्याची घंटा; मुंबईचा कौल ‘मविआ’च्या बाजूने?
Assembly Elections : लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये मुंबईने महाविकास आघाडीला साथ दिली. (Elections ) मुंबईतील सहापैकी दोन जागा महायुतीला मिळाल्या. मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल आणि मुंबई उत्तर-पश्चिममधून रवींद्र वायकर सोडल्यास एकाही जागी महायुतीला यश मिळवता आलेलं नाही. (Assembly Elections ) मुंबईकरांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा पाठिंबा दिल्याचं चित्र लोकसभेत तरी पाहायला मिळालं आहे.
पुजा खेडकरच्या आईचं पंकजा मुंडेंच्या कारखान्याशी कनेक्शन इतक्या लाख रुपयांचा दिला होता चेक
लोकसभेला मिळालेलं यश पाहता विधानसभेतही तेच चित्र दिसेल, अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. मात्र, भाजपसह महायुतीने आता जोरदार तयारी सुरू केली. त्यामुळे सर्वत्र अटीतटीच्या लढती होणार, अशी चिन्हं आहेत. अनेक मतदारसंघांत उमेदवार कोण किंवा इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत युती आणि आघाडीचा उमेदवार ठरवण्यात कस लागणार आहे. शिवाय त्यामुळे होणारी बंडखोरी, पक्षांतराचे मुद्देही महत्त्वाचे ठरणार आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी भाजपला सर्वाधिक १६ जागा मिळाल्या. त्याखालोखाल शिवसेना १३, काँग्रेस पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. लोकसभा निवडणुकीत मुंबईवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्चस्व दिसले. मुंबईतील विकास प्रकल्प हा यंदा महायुतीच्या प्रचारात प्रमुख मुद्दा असेल; मात्र तरीही पुनर्विकासाचे मुद्दे, पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, कोळीवाडे, मराठी विरुद्ध गुजराती वाद असे अनेक मुद्दे कळीचे ठरणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण या दोन्ही मतदारसंघात महायुतीने विजय मिळवला. भिवंडी लोकसभा खेचून आणण्यात महाविकास आघाडीला यश आलं. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा दिसत असला तरी प्रत्यक्षात एका जागेचे नुकसान झालं आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पडलेल्या मतांची गोळाबेरीज पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १८ जागांपैकी किमान पाच ते सहा ठिकाणी राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीतील गद्दारी महागात पडणार; फुटलेल्या काँग्रेस आमदारांची नावं आली समोर
ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एकही आमदार नाही. पण सद्यस्थितीत ठाकरे गटाला किमान दोन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम येथे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भिवंडी पश्चिम, उल्हासनगर हे दोन विधानसभा राखण्यासाठी भाजपसमोर आव्हान दिसते. शहापूरमधील एकमेव राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारालाही धोक्याचा इशारा आहे.
महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांना लोकसभेत चांगली मते मिळाली. त्यामुळे वसई, नालासोपारा व पालघर, बोईसर विधानसभेत भर द्यायला हवा, तर महायुतीदेखील वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड आणि डहाणू भागात आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करू शकते. आगामी विधानसभेत महायुती, मविआ आणि बहुजन विकास आघाडी हे पक्ष आपले राजकीय वर्चस्व निर्माण व्हावे, म्हणून प्रयत्न करणार आहेत.
मतांची टक्केवारी
- काँग्रेस -25.83%
- भाजप -21.93%
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) -20.37%
- शिवसेना -8.66%
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) -8.03%
- इतर- 5.08%
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना -2.50%
- बहुजन विकास आघाडी -2.27%
- राष्ट्रवादी काँग्रेस- 1.76%
- वंचित बहुजन आघाडी -1.18%
- अपक्ष -0.85%
- आम आदमी पक्ष -0.50%
- एमआयएम -0.37%
- शेकाप -0.24%
- स्वाभिमानी शेतकरी पक्ष -0.24%
- प्रहार -0.12%