Download App

नव्या पेन्शनवर केसरकर बोलताच कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी; मंत्र्यांनी एक भीतीही सांगितली !

  • Written By: Last Updated:

Deepak Kesarkar On New Pension scheme: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पहिलेच जुनी पेन्शन महाअधिवेशन शिर्डीत रविवारी शिर्डीत झाले. या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी तर सरकार बदला मी तुम्हाला जुनी पेन्शन तशीच्या तशी देतो, अशी जाहीर करून टाकले. या महाअधिवेशनाचा शिक्षणमंत्री दीपक केसरकरही (Deepak Kesarkar) आले होते. त्यांनी आपल्या भाषणात जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत काहीच फरक नाही. तुम्हाला तेवढेच पैसे मिळतील, असे सांगणास सुरूवात केली. त्यावेळी काही कर्मचारी संतापले, त्यांनी लगेच घोषणाबाजी सुरू केली आहे.

सरकारचा मोठा निर्णय, 16 सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षागाथा!

शिक्षणमंत्री दीपक केसरकर, तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका असेल तर ती काढून टाका. जुनी पेन्शन योजनेत (Old Pension Yojana) जेवढे पैसे मिळत होती, तेवढेच पैसे पेन्शन नव्या योजनेत मिळणार आहे. असे सांगत असताना कर्मचाऱ्यांनी केसरकर यांच्यासमोरच घोषणाबाजी सुरू केली. प्रत्येकाची काही अधिकार असताना तुम्ही ते मागू शकतात. तुम्ही बघितले ना राजस्थानने जुनी पेन्शन योजना लागू केल्यावर काय झाले ते तुम्हाला कळेल वेळेवर पगार, पेन्शन मिळणार नाही.

राहुल गांधी देशातील एक नंबरचे दहशतवादी; त्यांच्यावर तर…. केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनीच केले आहे. शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिलाय. कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमलीय. त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईलच. पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढू. केंद्राने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे. पण विरोधक यावर संभ्रम पसरविला जात आहे. काही लोक येथे भाषण करून गेले असतील, ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत, अशा शब्दात केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

follow us