Download App

Dhangar Reservation : ‘लवकरच सकारात्मक कृती दिसेल’; राम शिंदेंचा उपोषणकर्त्यांना शब्द

Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं असतानाच आता पुन्हा एकदा धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुन्हा यशवंत सेनेकडून उपोषण सुरु करण्यात आलं आहे. जोपर्यंत सरकार मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी भाजपचे आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांनी भेट देऊन धनगर समाजाची पूर्ण करण्याबाबत ठोस पाऊलं उचलली जात असून लवकरच मागणी पूर्ण होणार असल्याचा शब्दच आंदोलकांना दिला आहे.

“कोणी उपोषणाला बसले अन् अंतिम मुदत दिली म्हणून…” : मागासवर्ग आयोगाने जरांगेंना फटकारले

सध्या राज्यात मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी जोर धरीत आहे. या मागणीसाठी मराठा बांधवांकडून अनेक आंदोलने, उपोषणांची मालिकाच सुरु आहे. तर या मागणीसाठी बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्याचंही पाहायला मिळालं आहे. अशातच आता जामखेडच्या चौंडीत सरकारविरोधात पुन्हा धनगर बांधवांनी उपोषण सुरु केलं आहे.

IND vs AUS Final : महामुकाबल्यापूर्वी दोन्ही टीमसाठी रिव्हर क्रूझ डिनर, असा आहे स्पेशल मेनू

यशंवत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महिन्यापूर्वी तब्बल एकवीस दिवसांचे आमरण उपोषण केले. ते उपोषण थांबविताना महाराष्ट्र सरकारने ५० दिवसांत अमलबजावणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, शासनाकडून मात्र यावर काहीच कारवाई न झाल्याने धनगर समाजबांधवांवर पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली असल्याचं दांगडे पाटील म्हणाले आहेत.

बागेश्वर धाम महाराजांच्या कार्यक्रमाला अनिसचा विरोध, जादूटोणा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, उपोषणकर्ते बाळासाहेब दौडतले आणि सुरेश बंडगर यांची भेट आज राम शिंदे यांनी घेतली आहे. यावेळी राम शिंदेंनी धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या कार्यवाहीसंदर्भात शासनपातळीवर तातडीने हालचाली सुरु असून लवकरच सकारात्मक कृती झालेली दिसणार असल्याचा शब्दच दिला आहे. या भेटीत राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूसही केली आहे.

राम शिंदे यांनी शब्द दिल्यानंतर उपोषण स्थगित केलं जाईल, असं दिसून येत होतं मात्र, जोपर्यंत सरकार मागणी पूर्ण करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण सुरुच ठेवणार असल्याचं माणिकराव दांगडे पाटील यांनी राम शिंदे यांना ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे आता राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाचाही मुद्दा पेटून उठणार असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us