Dhule News : धुळे येथील गुलमोहोर रेस्ट हाऊत प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे पुन्हा आक्रमक झाले आहेत. बारा दिवस उलटल्यानंतरही तिसरा संशयित पोलिसांना सापडत नाही त्यामुळे हा तपास आहे की काय? असा सवाल गोटे यांनी आज उपस्थित केला. धुळे पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नाहीत, असा आरोपही गोटे यांनी यावेळी केला.
धुळे येथील गुलमोहर रेस्ट हाऊस येथील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या रोकड प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारला इशारा दिला होता. यानंतर प्रशासनाने हालचाली केल्या. या प्रकरणात पोलिसांनी अनिल गोटे यांचा जबाब नोंदवला. यानंतर गोटे अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी कठोर शब्दांत पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. धुळे पोलीस सदर प्रकरणाच्या बाबतीत गंभीर नाहीत आणि तपास करत नाही असा आरोप त्यांनी केला.
तब्बल 12 दिवस उलटूनही तिसरा संशयित आरोपी पोलिसांना सापडत नाही त्यामुळे हा तपास आहे की काय? असा सवाल देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला. अवघ्या 24 तासांची ही घटना असून तपास करण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत. मुळातच पोलिसांना हा तपास पूर्ण करायचा नाही आणि संशयितांना पाठीशी घालायचं आहे असा अत्यंत गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज केला.
रुम नंबर 102, दोन कोटी अन् गोटेंनी डाव उधळवला; खोतकरांचा माणूस अडकला
विधिमंडळ अंदाज समिती मागील महिन्यात धुळे दौऱ्यावर होती. काही आमदार या विश्रागृहावर मुक्कामी आले होते. त्याचवेळी माजी आमदार अनिल गोटे हे गेस्ट हाऊसमध्ये आले. अनिल गोटे हे विश्रामगृहात एखाद्या आमदाराला भेटायला आलेत, असे सर्वांना वाटले. परंतु गोटे हे एका रुमकडे निघाले. ही रुम 102 नंबरची होती. या रुममध्ये राहणाऱ्या व्यक्ती अधीच कुलूप लावून निघून पसार झाले होते. नंतर गोटे यांनी कार्यकर्त्यांसोबत विश्रामगृहावर आंदोलन सुरू केले. तब्बल पाच तास हे ठिय्या आंदोलन सुरू होते.
जिल्हाधिकारी आणि एसपींच्या उपस्थितीत रुम उघडण्याची मागणी त्यांनी केली. या रुममध्ये पाच कोटी रुपये असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. बराच गदारोळ झाल्यानंतर काही वरिष्ठ अधिकारी गेस्ट हाऊसला येतात. कुलूप तोडून रुमध्ये उघडली जाते. रुममध्ये काही बॅगमध्ये रोकड आढळून येते. त्यानंतर अधिकारी हे जवळपास तीन मशीनद्वारे हे पैसे मोजतात. रात्रभर पैशाचे मोजणी सुरू होती. तब्बल 1 कोटी 84 लाख रुपये आढळून आले.
धुळे रोकड प्रकरणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर अन् कमिटीचे चेअरमन…अनिल गोटेंनी थेट नावचं घेतलं