Download App

भाजपला दणका! भाजप नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश; एक लाख मतं घेणारा नेताही शिवबंधनात

भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटात इनकमिंग सुरू झालं आहे.

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार शिगेला (Maharashtra Elections 2024) पोहोचला आहे. तर दुसरीकडे नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतरही सुरुच आहे. आताही भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटात इनकमिंग सुरू झालं आहे. वंचित बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका इंदूमती नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे यांच्यासह भाजप कामगार आघाडीचे नेते विक्रम गागरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने खासदार संजय राऊत आले होते. त्यावेळी या नेत्यांनी संजय राऊत यांची भेट घेत ठाकरे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी हाती शिवबंधन बांधलं. यावेळी माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोहरादेवी महंतांचा जय महाराष्ट्र; नाराजीही उघड 

मागील विधानसभा निवडणुकीत पवन पवार यांना वंचितने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत पवन पवार यांनी तब्बल 1 लाख 9 हजार 981 मते घेतली होती. आता पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मतदारसंघातील गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक पूर्व आणि देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे फायदा होईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

पोहरादेवीच्या महंतांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

निवडणूक अगदी जवळ आलेली असतानाच पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला.  त्यांनी घेतलेला हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सुनील महाराज ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. ठाकरे गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सुनील महाराज यांना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे सांगितले.

ठाकरे सरकारला जे जमले नाही, ते महायुतीने केले; राणाजगजितसिंह पाटलांनी वाचला विकासाचा पाढा

follow us