उद्योजक विजय सेठींचे दातृत्व; भूमिपूत्राकडून डॉ.तनपुरे कारखान्यासाठी एक कोटींचा धनादेश !

Vijay Sethi: आमचे वडील येथे कपड्यानिशी आले होते. तनपुरे कुटुंबीय आमचे पालक होते. त्यामुळे येथे आम्ही एक दुकान सुरू करू शकलो.

Vijay Sethi Help Dr. Baburao Tanpure 1 Crore

Entrepreneur Vijay Sethi's donation one crore rupees for Dr. Tanpure Sugar factory:

राहुरी येथील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना (Dr. Tanpure Sugar factory) आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेला आहे. हा कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी नवीन संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. हा कारखाना सुरू होण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यातून राहुरीचे भूमिपूत्र असलेले उद्योजक विजय सेठी (Entrepreneur Vijay Sethi) व त्यांच्या कुटुंबाकडून कारखाना आर्थिक मदत करण्यात आली. कारखान्यासाठी सेठी यांनी तब्बल एक कोटींचा धनादेश दिलाय. हा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी स्वीकारला. यावेळी उद्योजक सेठी व तनपुरे हे भावूक झाल्याचे दिसून येत आहे.


पुणे पदवीधरसाठी महायुतीची जोरदार तयारी; भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उमेदवाराची केली घोषणा

उद्योजक विजय सेठी म्हणाले, राहुरी येथील बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हे आमचे कुटुंबिय आहे. आमचे बालपण येथे गेले या कारखान्याचे गतवैभव आम्ही बघितले होते, गेलेले गतवैभव परत मिळावे अशी आमच्या वडिलांची इच्छा होती. म्हणून आज आम्ही एक कोटी रुपयांची मुदत ठेव देत आहोत. आपण या कारखान्याचे गतवैभव परत मिळवून द्या, आम्ही निस्वार्थ तुमच्या बरोबर आहोत, अशी भावनिक साद उद्योजक विजय सेठी यांनी घातली.

उपमुख्यमंत्री पदाच्या विक्रमानंतर अजित पवारांचा दुसरा विक्रम; सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी

आज रविवारी सायंकाळी राहुरी येथील उद्योजक विजय सेठी यांच्या निवासस्थानावर डॉ. तनपुरे कारखान्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्याकडे एक कोटी रुपयांची मुदत ठेवीची धनादेश सुपुर्त करत सर्वांनाच एक सुखद धक्का दिलाय.

मी खारीचा वाटा उचललाय: सेठी

आमचे वडील येथे कपड्यानिशी आले होते. तनपुरे कुटुंबीय आमचे पालक होते. त्यामुळे येथे आम्ही एक दुकान सुरू करू शकलो. त्यातूनच आम्ही आता परदेशात व्यवसाय करत आहोत. या कारखान्याचे गतवैभव आम्ही बघितलेले आहे. मात्र आहे याची अवस्था बघुन खुप दुखः होते. म्हणून आम्ही भुमिपूत्राने मागितले नाही पाहीजे ,तर दिले देखील पाहीजे या भावनेतून हा खारीचा वाटा उचलला असल्याचे सेठी यांनी सांगितले. प्रसंगी हा धनादेश स्वीकारताना कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे हे भावनिक झाले. राहुरीतील सर्वच उस उत्पादन शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी सेठी परिवाराचे आभार मानले.

यावेळी संजय सेठी, बादल सेठी, उद्योजक ऋषभ लोढा, जोगिंदर कथुरीया, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन, साई समाधानचे दत्तात्रय दरंदले, प्रशांत वाबळे, प्रकाश सोनी, डॉ.संदीप मुसमाडे, नंदू मोरे, रामेश्वर तोडमल, सुरेश नागपाल, अनिल इंगळे, रमेश दुधाडे, दत्तात्रय साळुंके, सतीश कुलकर्णी, कुंदन शर्मा,नितीन डमाळे,साई त्रिभुवन आदिंसह मान्यवर उपस्थित होते.


वडिलांची इच्छा पूर्ण केलीय-सेठी

आमचे कुटुंब व्यवसायासाठी वीस पंचवीस वर्षापूर्वी पुण्यात स्थायिक झालो होतो. परंतु वडिलांनी शेवटचे दिवस येथेच घातले होते. या कारखान्याची अवस्था बघुन, त्यांनी मला या कारखान्यासाठी मदत देण्याचे सांगितले होते. त्यानुसार मी भूमिपूत्र म्हणून आर्थिक ठेव दिलेली आहे. तशाच पद्धतीने अनेकांनी पुढे येऊन कारखान्याला मदत करावी, असे आवाहन उद्योजक विजय सेठी यांनी केले आहे.

Exit mobile version