Download App

पालक नसलो तरी, मी नाशिकचा बालक; मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच भुजबळांची फटकेबाजी

Chhagan Bhujbal ची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यानंतर आज भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली.

Even though guardian, I am a child of Nashik Chhagan Bhujbal attack on post of Guardian Minister : छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा आणि प्रभावशाली ओबीसी चेहरा आहेत. सध्या ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असून, नाराजी नाट्यानंतर आता पुन्हा भुजबळांची (Chhagan Bhujbal) फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यानंतर आज भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

All New Tata Altroz ची बाजारात धमाकेदार एंट्री; स्टायलिश लूकसह किंमत फक्त 6.89 लाख रुपये

यावेळी छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदाबाबत विचारले असता. त्यांनी थेट शेरो शायरीचा आधार घेत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कधी कधी जे वाटत नाही ते सुद्धा घडत असतं. जो ख्वाबो में देखते है वो हकीकत मे कहा? जो जिंदगी सीखाती है वो किताब कहा ? मी मंत्री झाल्यानंतर नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून माझे बोर्ड लागले. पण कार्यकर्त्यांना म्हटलं की, यावरून वाद विवाद वाढवू नका.

बोगस बियाण्यांचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

मी जरी नाशिकचा पालकमंत्री नसलो. तरी देखील मी नाशिकचा बालक आहे. ते पद माझ्याकडून कुणीहा काढून घेऊ शकत नाही. कारण पालकापेक्षा बालकाला मातेबद्दल जास्त प्रेम असतं. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर सोपवून देऊ या. असं म्हणत त्यांनी पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

“हगवणे कुटुंबाकडून मलाही आमंत्रण मिळालं होतं पण मी..”, सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं?

तर यावेळी आपल्याला उशीरा का होईना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, मैं आगे बढता हून, जरा चूप बैठो
मला काल मीडियाने विचारले, तुम्ही म्हणाले होते. जहा नही चैना वहा नही रेहाना. मी म्हणलो, देर से आया ,दुरुस्त आया. मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होता है. वही होता है जो मंजूर ए खुदा होता है.

पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवलं

मागच्या मंगळवारी आमची मीटिंग झाली आणि ठरलं की शपथ घ्यायची आहे.पण कोणालाच मी सांगितलं नाही. मोदी आणि अमित शहा यांनी त्यावेळेस सांगितलं की हे दुरुस्त करायला पाहिजेल. फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले. माझ्या पेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्यांना झाला. साप शिडीचा खेळ आहे. थोड वर गेल की खाली. चालूच आहे. काय करणार.

follow us