Nashik : नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? नामांकित कंपनीतलं कांड, नोकरीचं अमिष देऊन अत्याचार…

नाशिकमध्ये एका नामंकित कंपनीत महिलांचं शोषण, धर्मांतरासाठी दबाव, विनयभंग प्रकरणी एका महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा केलायं.

Untitle (41)

Untitle (41)

Exploitation of Women : महिलांचं शोषण प्रकरणी आधीच चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडालेली असतानाच आता नाशिक जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीयं. एका नामंकित आयटी कंपनीत महिलांचं शोषण, धर्मांतर आणि विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झालायं. महिलांचं शोषण आणि तरुणांवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलीयं. धर्मांतराचे तरुणाचे काही फोटोज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडालीयं. कंपनीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

युद्ध संपलं, पण ट्रम्प यांचा दरारा सुरूच; इराणला शस्त्रे पुरवणाऱ्या देशांवर 50 % टॅरिफचा झटका

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर ‘माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली’ असे उपकाराचे ओझे टाकून महिलांना जाळ्यात ओढले. पीडितेच्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या अवयवांकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि त्यांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, असे प्रकार तिथे सुरू होते. केवळ महिलाच नव्हे, तर एका तरुण कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. धार्मिक भावना दुखावल्या, महिला अत्याचार आणि विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली असून आत्तापर्यंत दाखल 9 गुन्ह्यांचा तपास पोलिस करीत आहेत.

‘लिंगपिसाट’ला सुट्टी नाहीच! पोलिस कोठडीतून सुटताच न्यायालयीन कोठडीत अडकला, सुनावणीत काय घडलं?

दरम्यान, 25 मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर, 2 आणि 3 एप्रिल रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणखी 8 गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version