Eknath Khadse On Bjp joining: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा स्वगृही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. एकनाथ खडसे यांचा (Eknath Khadse) भाजपमध्ये (Bjp) मोठ्या नेत्यांच्या उपस्थित प्रवेश होणार असल्याचे गेल्या दीड महिन्यापासून बोलले जात होते. ग्रामविकास मंत्री गिरीश (Girish Mahajan) महाजन यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रेची सभा झाली. या सभेत एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशावर स्पष्ट भूमिका मांडत गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, 8 उच्च न्यायालयाला अखेर मिळाले सरन्यायाधीश
भाजप प्रवेशाबाबा एकनाथ खडसे म्हणाले, मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मला भाजपमध्ये प्रवेश द्या, असे मी म्हटले नव्हते. मला भाजपमध्ये प्रवेशाचे निमंत्रण होते. ते निमंत्रण कसे होते ? हे शरद पवार, जयंत पाटील यांना माहीत आहे. गेल्या 35 वर्षांत जामनेर शहरात व तालुक्यात शेकड्यानी माझ्या सभा झाल्यात. पण एेवढी मोठी सभा कधीही झालेली नाही. या ठिकाणी परिवर्तन व्हावे, असे वाटते. खऱ्या अर्थाने ही परिवर्तनाची सभा आहे. यंदा धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचे निवडणूक आहे.
कोणतीही भाषा खपवून घेणार नाही; अजित पवारांचा कोकणातूनच नितेश राणेंना निर्वाणीचा इशारा
35 वर्षांपूर्वी जामनेर मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मनोहर पाटील त्यांचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचाराला मी आलो होतो. गिरीश महाजन हे सरपंच होते. त्या काळात मतदारसंघ बदलण्यात आला. हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनाला दिला म्हणून गिरीश महाजनांचा नंबर येथे लागला. आता असं वाटतं पाप केलं. ज्या माणसाला मोठे करण्याचे काम केले. प्रमोद महाजन यांना सांगून त्यांना तिकीट दिले. तो निवृत्त शिक्षकाचा मुलगा आहे. पण अलीकडचे त्याचे वर्तवणूक बघा. याला दुधाशिवाय जमतंच नाही. याने किती ठिकाणी दूध काढले आहे काही माहिती. आता काय-काय बडबड करतोय.
गिरीशभाऊ तुम्ही पंधरा कोटी घेतली की नाही ?
गिरीश महाजन हे पाटबंधारे मंत्री राहिले आहे. एका धरणाचे काम 2 कोटी 64 लाखांचे होते. पण यांनी 46 कोटींचा खर्च केला. जमिनी घेतल्या भूसंपादन भूसंपादन केले. एका व्यक्तीने पंधरा कोटी रुपये घेतले. गिरीशभाऊ तुम्ही पंधरा कोटी घेतले की नाही, धरणांवर कमाई केली केली की नाही, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर केला.