Download App

गडाखांच्या अडचणीत वाढ, 137 कोटी थकवले, मुळा कारखान्याला आयटीने पाठवली नोटीस

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांच्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली. या

  • Written By: Last Updated:

Shankarao Gadakh : आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना देखील वेग आला. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) मधील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत (Mula Sahakari Sugar Factory) मोठी बातमी समोर आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांच्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये कारखान्याला १३७ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे.

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेला दिसणार सिनेमागृहात 

नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी 2019 मध्ये ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या गडाख यांना त्यावेळी राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळाला होता. दरम्यान, गडाख यांनी नुकताच शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनाई येथील मुळा सहकारी साखर कारखाना शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली येतो. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ न सोडल्यामुळं मुळा कारखान्यावर राजकीय हेतून वार करण्याचा तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांची राजकीय आणि आर्थिक कोंडी करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं बोलल्या जातं.

अजितदादांच्या पहिल्या यादीत नव्या पाच चेहऱ्यांना संधी; खोसकर, विटेकरांना उमेदवारी 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कारखान्याला ही नोटीस आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. ही नोटीस शंकरराव गडाखांसाठी धक्का मानला जात आहे. तर या सगळ्यामागे राजकारण असल्याचा आरोप करत कोर्टात दाद मागणार असल्याचं गडाख म्हणाले. आयकर विभागाने मुळा कारखान्याला 137 कोटींच्या संदर्भात नोटीस पाठवल्यावल्यानंतर गडाखांनी प्रतिक्रिया दिली. या नोटिशीच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असून या सर्व घडामोडीमागे राजकारण असल्याचा आरोप गडाख यांनी केला. यापूर्वीही संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, असंही गडाख म्हणाले.

नाबार्डने कर्ज फेटाळलं, आयटीने पाठवली नोटीस…
मुळा सहकारी साखर कारखान्याने नाबार्डकडे 125 कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. मात्र, हे कर्ज फेटाळत प्राप्तिकर विभागाने कारखान्याला 137 कोटी रुपये भरण्याची नोटीस पाठवली. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईबाबत वरिष्ठांकडे दाद मागण्याची वेळ आल्यास कारखानान्याने आधी 137 कोटी रुपयांपैकी 40 टक्के रक्कम भरण्याचे सांगण्यात आलं. कारखान्याने आतापर्यंत 40 लाख रुपये भरल्याची माहिती आहे.

follow us