नगर लोकसभेसाठी शंकरराव गडाखच प्रबळ; खासदार संजय राऊतांचं मोठं विधान

नगर लोकसभेसाठी शंकरराव गडाखच प्रबळ; खासदार संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) हेच प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. एकीकडे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंनी लोकसभेची घोषणा केल्यानंतर आता संजय राऊतांनीही नगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असणार? याबाबत संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत यांनी शिर्डीतून माध्यमांशी संवाद साधला.

Share Market : अखेरीस गेम पलटला; सेन्सेक्समध्ये वाढ, गुंतवणूकदारांची चांदी

संजय राऊत म्हणाले, नगर लोकसभा मतदारसंघाची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेच्या अदलाबदलीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, माजी मंत्री आ. शंकरराव गडाख या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उमेदवार आहेत, नगर लोकसभा मतदारसंघाची जागा आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, आणि या जागेच्या अदलाबदलीची कोणतीही चर्चा अद्याप झाली नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावरही भाष्य केलं आहे.ते म्हणाले, ठाकरे गट वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत. एकनाथ शिंदे शिवसेना स्थापन करायला गेले होते का? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील किंवा नसतीलही, अशी खोचक टीका राऊतांनी शिर्डी लोकसभेच्या जागेवरुन केली आहे.

नार्वेकर-शिंदे भेट धक्कादायक, CM शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी नियमच सांगितला

हे तर आमसूलमंत्रीच…
हे कसले महसूलमंत्री हे तर आमसूलमंत्री असल्याची टीका संजय राऊत यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचं नाव न घेता केली आहे. विखे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीके केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी विखेंवर टीका केली आहे.

दरम्यान, संजय राऊत आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेत महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त व्हावा, ही प्रार्थना साईबाबांकडे केली आहे. यावेळी राऊत यांचा साई संस्थानातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, सचिन कोते, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभाताई घोगरे, संजय छल्लारे, सुयोग सावकारे, श्रीकांत मापारी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube