Download App

देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू, तर 7 जण गंभीर जखमी

  • Written By: Last Updated:

Jalgaon Accident News : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. मनमाड-येवला महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आता चाळीसगाव येथील कन्नड घाटात (Kannada Ghat) मध्यरात्री भीषण अपघात झाला. देवदर्शनाहून परत असताता भाविकांच्या खाजगी वाहनाला गंभीर अपघात झाल्यानं कार खोल दरीत कोसळली. या दुर्दघटने 4 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले.

IPL 2024 : मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत! अखरेच्या दोन तासांत गुजरातने ‘सेनापती’ सोडला 

अपघातात बचावलेल्या मुलाने प्रंसंगावधान राखत घटनेची माहिती देताच रात्री एक वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या पथकासह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलीसांनी पोहोचून अपघातग्रस्तांना खोल खड्ड्यातून बाहेर काढले. रात्री घाटावर दाट धुके होते. पावसही सुरू असल्यानं मदतकार्यात अडथळा आला होता. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार पथके तयार करून जखमींना मदत करण्यात आली.

Filmfare Ott Award 2023: आलियाने ओटीटी पुरस्कारामध्ये मारली बाजी, ‘या’ कलाकारांचाही झाला सन्मान! 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील जानेवाडी येथील काही भाविक खासगी वाहनाने (कार क्र. MH41V 4816) ने देवदर्शनासाठी अक्कलकोटला गेले होते. ते कन्नडघाटमार्गे औरंगाबादहून चाळीसगावला येत असताना घाटमार्ग संपण्यापूर्वी एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. कारचा चालक अभय पोपटराव जैन (वय 50) हा काचेवर धुक्यामुळं आलेली वाफ पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले. त्यामुळं कार थेट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर एका 8 वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला.

प्रकाश गुलाबराव शिर्के (वय-65), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय-60), वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (वय-35), पूर्वा गणेश देशमुख (वय-8) अशी जममींची नावे आहेत. तर अनुज धर्मेंद्र सूर्यवंशी (वय – 21), जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (वय 17), सिद्धेश पुरुषोत्तम पवार (वय 12), कृष्णा वासुदेव शिर्के (वय – 4), रुपाली गणेश देशमुख (वय – 30), पुष्पा पुरुषोत्तम पवार (वय 35) अशी जखमींची नावे आहेत.

या अपघातात गाडीचा अक्षरश: चुक्काचूर झाला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

Tags

follow us