पुणे : वडगाव शेरी परिसरात इथेलिन ऑक्साईड वायू टँकरचा अपघात; नगर रोडवरील वाहतूक विस्कळीत

  • Written By: Published:
पुणे : वडगाव शेरी परिसरात इथेलिन ऑक्साईड वायू टँकरचा अपघात; नगर रोडवरील वाहतूक विस्कळीत

पुणे : पुणे-नगर महामार्गावर वडगाव शेरी परिसरात आज (सोमवारी) पहाटे इथनॉल ऑक्साईड (Ethanol oxide) वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत आहे. रहदारीचा परिसर असल्याने आणि या वायूमुळे आग लागण्याची शक्यता असल्याने पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

नाशिक, जळगाव, नगरला गारपिटीने झोडपले, कांदा, द्राक्ष बागांचे नुकसान, बळीराजा चितेंत 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकर गॅस पुण्याहून नगरच्या दिशेने जात होता. सोमवारी सकाळी टँकर वडगाव शेरी चौकाजवळ आला असता चालकाचे टॅंकरवरील ताबा सुटला. चालकाचे नियत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले.

मोठी कारवाई! गझवा-ए-हिंद मॉड्यूलचा एनआयएकडून पर्दाफाश, चार राज्यात छापेमारी 

रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचे बचाव आणि दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत टँकरवर सातत्याने पाण्याचा मारा सुरु आहे. स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसही घटनास्थळी उपस्थित आहेत. हा टॅंकर रस्त्याच्या मधोमध उलटल्यानं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे दरम्यान, नगरकडे जाणारी वाहतूक नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक नॉव्होटेल हॉटेल ते विमाननगर परिसरात आतील मार्गाने वळविण्यात आहे. प्राथमिक माहितीनुसार नगर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube