नाशिक, जळगाव, नगरला गारपिटीने झोडपले, कांदा, द्राक्ष बागांचे नुकसान, बळीराजा चितेंत
Heavy Rain : ऐन हिवाळ्यात काल राज्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह (Heavy Rain) जोरदार पाऊस झाला. दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. राज्याच्या बहुतांश भागात गारपीट झाली आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळं आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे (Faramer) मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं बळीराजा हताश झाला आहे.
मोठी बातमी! पुणे-नगर रस्त्यावर इथिलिन ऑक्साईड वाहून नेणाऱ्या ट्रॅंकरचा अपघात
काल नाशिक, जळगाव, पुणे, नगर, चाळीसगाव या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी खरीप हंगामातील पिकांचे चांगलचं नुकसान झालं. चाळीसगावामध्ये झालेल्या गारपिटीमुळे कापूस, गहू, हरभरा, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असतांना थोड्याफार प्रमाणता आलेले कांदा व कापूस पिकांचा या अवकाळी पावसांनं चांगलचं नुकसान केलं. नाशिक शहर व सिन्नर तालुक्यात गारपिटीमुळे कांदा व द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यातील 15 लाख भाविकांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येत नेणार, बावनकुळेंची घोषणा
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीकं वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे. वादळी पावसासह आलेल्या गारपिटीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं. दरम्यान, थंडीच्या मोसमात पाऊस सुरू झाल्यानं हंगामी पिकांवर रोग पडण्याची भीती व्यक्त केली जाते.
मिरचीचे मोठे नुकसान
नंदुरबारमध्ये मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली सुमारे 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली आहे. त्यामुळे 30 टक्के मिरची खराब होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गारपिटीमुळे जनावरांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे दोन जनावरांचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील फणस पाडा येथील शेतकरी बनशे पवार यांचा बैल आणि इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील शंकर निसरड यांचा अवकाळी पावसामुळं गोठा कोसळल्यांन म्हैस मृत्यूमुखी पडली.