मोठी कारवाई! गझवा-ए-हिंद मॉड्यूलचा एनआयएकडून पर्दाफाश, चार राज्यात छापेमारी
Ghazwa-e-Hind Module : राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) पाकिस्तान पुरस्कृत गझवा-ए-हिंद मॉड्यूल (Ghazwa-e-Hind Module) प्रकरणात चार राज्यांमध्ये छापेमारी केली. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि केरळमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. एनआयएच्या छाप्यात संशयितांचे पाकिस्तानस्थित हॅंडलर्शी असलेले संबंधही उघड झाले. हे संशयित हॅंडलर्सच्या संपर्कात होते आणि गझवा-ए-हिंदच्या कट्टर विचारांचा प्रसार करण्यात त्यांचा सहभागा होता
राज्यात पुढील ४ ते ५ तासांत अवकाळी पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
गझवा-ए-हिंद दहशतवादाच्या प्रसाराचे बिहारमध्ये उघडकीस आलेले प्रकरण आहे. या मॉड्युलचे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आणि भारतात हल्ले घडवण्याचा डाव असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सुरुवातीला बिहार पोलिसांनी तपास केला होता. त्यानंतर काल एनआयएने मध्य प्रदेशातील देवास, गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्हा, उत्तर प्रदेशातील आझमगड आणि केरळमधील कोझिकोड येथे संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. एनआयएच्या कारवाईत मोबाईल फोन आणि सिमकार्डशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
Rain Update: नगर, पुणे, नाशिकला अवकाळी, गारपीटीचा तडाखा; पिके भुईसपाट !
बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील फुलवारीशरीफ पोलिसांनी मरगूब अहमद दानिश उर्फ ताहिरला अटक केल्यानंतर १४ जुलै २०२२ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. झैन नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने तयार केलेल्या ‘गझवा-ए-हिंद’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा मरगून हा अॅडमिन होता.
आरोपी मरगून याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि येमेनसह इतर देशांतील लोकांना या ग्रुपमध्ये सामील केले होते, जे टेलिग्राम आणि बीआयपी मेसेंजर सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील सक्रिय होते. एनआयएच्या तपासानुसार, भारतात गझवा-ए-हिंद स्थापन करण्याच्या नावाखाली तरुणांना कट्टरपंथी बनवण्याच्या उद्देशाने हा व्हॉट्सअॅप ग्रुप पाकिस्तानमधील संशयितांनी चालवला होता
तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा कट
एनआयएच्या तपासानुसार, आरोपी मरगूब भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्लीपर सेल तयार करण्याच्या उद्देशाने गटाच्या सदस्यांना प्रेरित करत होता. याशिवाय आरोपीने ‘बीडीगजवा ए हिंदबीडी’ नावाचा आणखी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता, ज्यामध्ये त्याने बांगलादेशी नागरिकांना जोडले होते.
NIA 22 जुलै 2022 पासून या प्रकरणाचा तपास करत आहे, तपास हाती घेतल्यानंतर 6 जानेवारी 2023 रोजी NIA ने आरोपी मरगूब अहमद दानिश विरुद्ध आयपीसीच्या कलम 121, 121A, 122 आणि कलम 13, 18, 18B अंतर्गत गुन्हा दाखल केला.