Jalgaon Loksabha : जळगावात उद्धव ठाकरे यांना मोठा बसला आहे. माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain) यांनी उद्धव ठाकरे गटाचा (शिवसेना) (Udhav Thackeray Group) राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीयं. सुरेश जैन यांच्या भाजप प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadvnis) तातडीने जळगावकडे रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आलीयं. सुरेश जैन यांनी भाजपात प्रवेश केल्यास जळगावात भाजपची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
“मी शब्द पाळला, ७२ तासांच्या सरकारमध्ये गेलो”; पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांनी काय सांगतिलं?
जळगावात विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुरेश जैन 1974 साली राजकारणात आहे. जैन हे 1980 साली पहिल्यांदा विधानसभेवर गेले होते. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर ते सलग 34 वर्ष आमदार राहिले होते. राज्यात 1995 साली युतीचे सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सर्वप्रथम मंत्रिपद दिले होते.
Sonu Sood: 10 वर्षाच्या मुलाच स्वप्न साकार करण्यासाठी सोनू सूद ठरला देवदूत, म्हणाला…
ठाकरे यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी मंत्रिपद दिलं होतं. सुरेश जैन यांनी जळगावात केलेला विकास, गोरगरीबासाठी केलेली विकासकामे पाहुन ठाकरे त्यांच्यावर प्रभावित झाले होते. सुरेश जैन यांनी सहकार क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली होती. जिल्हा बॅंक ते साखर कारखाने सर्वत्र ते परिचित होते. दरम्यान, २०१४ पासून प्रकृतीच्या कारणास्तव सुरेशदादा राजकारणातून बाहेर पडले. सर्व समाजातील नागरिक, व्यापारी व उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.