पारोळ्याची जागा शरद पवार घेणार? सतीश पाटलांनी सांगितलं विधानसभेचं गणित
Satish Patil News : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सर्व्हेत सतिश पाटील सहा ते सात टक्क्याने पुढे आहे, त्यामुळे पारोळ्याची जागा मलाच मिळणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आणि माजी मंत्री सतीश पाटील यांनी (Satish Patil) केला आहे. ते लेटस्अप मराठीच्या लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. अशातच आता जळगावमधील पारोळा मतदारसंघातही उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
सतीश पाटील पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे एकूण पाच आमदार आहेत. या गद्दार आमदारांना पाडण्यासाठी महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी सर्व्हे केला आहे. ज्या उमेदवारांचं इलेक्टेव्ह मेरिट असेल त्यालाच प्राधान्य मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व्हेत पारोळ्यामध्ये सतीश पाटील हल्लीच्या आमदारांपेक्षा सहा ते सात टक्क्याने पुढे आहे, त्यामुळे मला तिकीट मिळणार असल्याचा विश्वास सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मोठी बातमी : जपानी संस्था ‘निहोन हिडांक्यो’ ला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
मोदींची सभा झाली तरीही राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत मला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान, पक्षांतर्गत काहींनी माझ्याविषयी अपप्रचार केला होता. त्यावेळी मी शरद पवारांना विश्वास दिला होता की, पारोळा मतदारसंघातून सतीश पाटीलच निवडून येईल, त्यानंतर मला शरद पवारांनी तिकीट दिलं होतं. निवडणुकीत मोदींची सभा झाली तरीही सतिश पाटील आमदार झाला होता. निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्वांच्या आधी माझा सत्कार केला होता. त्यावेळी मोदींची सभा झाली तरीही सतीश पाटील निवडून आल्याचे म्हणत शरद पवार यांनी कौतुक केले होते, अशीही आठवण पाटील यांनी सांगितली.
Train : फक्त एक मेसेज केल्याने TC धावत येईल मदतीला; ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी खास सुविधा
जळगावात पाच आमदार शिवसेनेचे आहेत. सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे, पण शरद पवार आणि जयंत पाटलांनी आम्हाला काही सुत्र सांगितले आहे. मी कधीही पक्षाच्या भूमिकेपासून लांब गेलो नाही. या लोकसभा निवडणुकीत माझं नाव पुढे येणार होतं, पण मी सांगितलं की मला लोकसभा लढायची नाही. कारण मला माझ्या मतदारसंघातील राहलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत. 2014 ला शरद पवारांनी आग्रह केला म्हणून मी लोकसभा लढलो होतो. पण तेव्हा मोदीलाट होती त्याचा बळी मी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.