रतन टाटांच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण? थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा..

रतन टाटांच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण? थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा..

Ratan Tata : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनानंतर टाटांच्या अफाट साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण असेल याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नियुक्त केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

Ratan Tata LIVE : उद्योगरत्न टाटा अनंतात विलीन; पोलिसांची मानवंदना, दिग्गजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहेत. टाटा ट्रस्टने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नोएल यांच्या नावावर सर्वांची सहमती असल्याचे सांगितले जात आहे. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन प्रमुख लोक आहेत. यामध्ये टीव्हीएसचे वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. हे दोघे 2018 पासून व्हाइस चेअरमन या पदावर कार्यरत आहेत. नोएल यांची कार्यशैली रतन टाटा यांच्यापेक्षा वेगळी मानली जाते.

नोएल टाटा मागील चाळीस वर्षांपासून टाटा समुहात कार्यरत आहेत. टाटा समुहाच्या अनेक कंपन्यांच्या बोर्डात ते सहभागी आहेत. टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, वोल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि टाटा स्टील तथा टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.

रतन टाटा सन १९६२ मध्ये टाटा इंडस्ट्रीमध्ये सहायक म्हणून सहभागी झाले होते. नंतर त्याच वर्षात टाटा इंजिनीरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या जमशेदपूर युनिट मध्ये सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. विविध कंपन्यांत काम केल्यानंतर १९७१ मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी निदेशक म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. १९८१ मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

1937 मध्ये रतन टाटांचा जन्म

देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापित केले. टाटा समुहाला त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवलं. हेच कारण आहे की देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक किंवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो.

Video : आता रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार; राज्य सरकारची मोठी घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube