Video : आता ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’; राज्य सरकारची मोठी घोषणा
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने उद्योग रत्न पुरस्काराबद्दल मोठा निर्णय घेतला असून, येथून पुढे राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा उद्योग रत्न पुरस्कार ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ पुरस्कार म्हणून दिला जाणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत उभारल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या उद्योग भवन इमारतीलादेखील रतन टाटा यांचे नाव दिले जाणार असल्याचे सामंत म्हणाले. रतन टाटाजी केवळ उद्योगपती नव्हते तर, ते एक वचनबद्ध व्यक्ती होते, त्यांनी जे सांगितले ते त्यांनी केले. त्यांच्या स्मरणार्थ यापुढे उद्योग रत्न पुरस्कार ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ या नावाने दिला जाणार आहे.
#WATCH मुंबई: दिग्गज उद्योगपति रतन टाटा के निधन पर महाराष्ट्र सरकार में मंत्री उदय सामंत ने कहा, "रतन टाटा जी सिर्फ एक उद्योगपति नहीं थे बल्कि एक प्रतिबद्ध व्यक्ति थे, उन्होंने जो कहा वो किया। उनकी स्मृति में हमने उद्योग रत्न पुरस्कार का नाम बदलकर रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार कर… pic.twitter.com/Wx24ippyeF
— ANI_HindiNews (@AHindinews) October 10, 2024
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले उद्योगरत्न
महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून दिला जाणारा पहिला पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते यंदाचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील ‘हालकाई’ बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार देण्यात आला होता.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह, 25 लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.