Kalicharan Maharaj On Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse: सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse) पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. याप्रकरणात आता नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराजांचा पुतळा कोसळणे हा त्यांचा अपमान आहे. एवढा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.
चंद्रकांतदादा आणि बालवडकरांमध्ये ‘पोस्टर वॉर’; दोघांचे एकाचवेळी, एकाच भागात महिलांसाठी कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळले हा त्यांचा अपमान असल्याचे कालिचरण महाराज यांनी नगरमध्ये म्हटले आहे. #chatrapatishivajimaharaj #kalicharanmahraj pic.twitter.com/pBKeJ06t6n
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 1, 2024
नगर शहरातील निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला कालिचरण महाराज यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना मालवण येथील घटनेवरून संताप व्यक्त केला. तसेच अशा घटनामधील दोशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.
“दोषींवर कठोर कारवाई करा”, रेल्वेतील ‘त्या’ मारहाणीच्या घटनेची अजितदादांनी घेतली दखल
यावेळी बोलताना ते म्हणाले, या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कालीचरण महाराज यांनी केलीय. महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हा हलगर्जीपणा हा महाराजांचा अवमान आहे. यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही. कारण ते स्वतः मूर्तीकार नाही त्यांनी खाली कामे दिले मात्र संबंधितांनी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. यामुळे मूर्तिकारसह जे इंजिनिअर यामध्ये दोषी आहे, अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराज यांनी दिली.