Vivek Kolhe News : राज्यात सध्या विधानसभआ निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांच्या कुटुंबियांना भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आली असल्याचं समजंतय. आम्ही तुम्हाला पुर्नवसनाचा शब्द देतो पण तुम्ही भाजप सोडू नका, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी कोल्हे कुटुंबियांना दिलायं.
मोठी बातमी! ‘परिवर्तन महाशक्ती’ कडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिरोळ, मिरज स्वाभिमानीसाठी
देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी तत्काळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर भाजपकडून कोल्हे कुटुंबियांना मुंबईकडे बोलवणं आलं आणि कोल्हे मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. याबाबत बोलताना कोल्हे म्हणाल्या, कोपरगावासह आजूबाजूच्या मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांना वाटतं की कोल्हेंनी भाजपात थांबावं. शिर्डीसह कोपरगाव मतदारसंघात विवेक कोल्हे यांना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून ऑफर आहे, अशी आजही परिस्थिती तर दुसरीकडे भाजपकडून आमच्यासोबत राहण्याचा आग्रह आहे. त्यामुळे विवेक कोल्हेंना देश पातळीवर भविष्यात काम करण्याची संधी मिळू शकते असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलंय.
शर्वरीच्या फिटनेसची जबरदस्त झलक! Monday Motivation म्हणत जिंकली चाहत्यांची मने
तसेच विवेक कोल्हे यांच्यासह कुटुंबियांवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पुढे सन्मानाने काही गोष्टी घडत असतील तर आम्ही विवेकच्या पाठिमागे उभे आहोत असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, विवेकने निवडणूक लढवावी अशा गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याचंही स्नेहलता कोल्हे यांनी स्पष्ट केलंय. तर कोल्हे कुटुंबियांनी भाजप सोडू नये, यासाठी भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव यांनी पुढाकार घेतला असून हा विषय केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यापर्यंतही जाऊ शकतो, असं कोल्हे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने माहिती दिलीयं.
देवाचं स्वतःहून बोलावणं येतं; अभिनेता स्वप्नील जोशी पोहचला बद्री केदारनाथच्या दर्शनाला!
दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यानच कोपरगाव मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलायं. तर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी विवेक कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विवेक कोल्हे आणि त्यांचे कुटुंबिय नेमकं कोणत्या पक्षात जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.