महाविकास आघाडीचे विवेक कोल्हेंना बळ ?; पण विखेंनी दराडेंना एक गठ्ठा मते देऊन गेम पलटवली !

  • Written By: Published:
महाविकास आघाडीचे विवेक कोल्हेंना बळ ?;  पण विखेंनी दराडेंना एक गठ्ठा मते देऊन गेम पलटवली !

Nashik Teachers Constituency election radhakrushna vikhe and Vivek kolhe: नाशिक शिक्षक मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) हे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर गेले आहेत. परंतु निवडणूक वेगळ्याच अर्थाने चर्चेत आली आहे. कारण महाविकास आघाडी उमेदवार (ठाकरे गट) अॅड. संदिप गुळवे हे होते. परंतु गुळवे यांना थेट तिसऱ्या क्रमांकाचे मते मिळालीत. अपक्ष विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली आहे. अपक्ष विवेक कोल्हे हे साखरसम्राट असून, त्यांच्या शिक्षणसंस्था आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काही नेते हे त्यांच्या पाठीशी होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. कोल्हे यांना विधानपरिषदेवर पाठविण्यासाठी महाविकास आघाडीने संदीप गुळवे यांच्या एेवजी कोल्हे यांना पसंती दिली होती. परंतु महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी महायुतीचा धर्म पाळत दराडे यांना चांगलीच मदत केली. त्यामुळे दराडे यांचा विजय सोपा झाला आहे.

उमेदवाराला जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. कोटा 19 व्या वगळणी फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाची 32 हजार 309 मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडून आले. 19 व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे (पाटील) (16280 मते) हे बाद झाले. अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी 31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार दराडे आणि कोल्हे यांना देण्यात आले. दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे यांना तिसरा फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली. तर सर्वाधिक पसंती
क्रमाची 6 हजार 72 मते पडली आहे. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची ताकद आहे. परंतु अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर नेले आहे. त्यामुळे याची वेगळीच चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

लोणावळ्यात फिरण्याचा प्लॅन तर जाणून घ्या नवीन नियमावली, रात्री 12 पासून होणार लागू

यातून आता अहमदनगर राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांनी मिळवून विखे यांना गणेश कारखान्याच्या निवडणुकीत थोबीपछाड दिली होती. विधानसभेचे राजकारणाचा विचार केल्यास कोपरगाव मतदारसंघात अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे आमदार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये असलेल्या स्नेहलता कोल्हे यांच्यासाठी हा मतदारसंघ मिळणे अवघड आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा विवेक कोल्हे हे निवडणुकीत नशिब अजमावत होते. कोपरगावमधील काळे व कोल्हे यांच्यात विधानसभेची लढती होत आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हे कुटुंब हे महाविकास आघाडीबरोबर येऊ शकते. शरद पवारांचे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये ते येऊ शकतात. त्यासाठी या निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हे यांना मदत केल्याचे आता चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याशिवाय इतके जास्त मते कोल्हेंना कसे मिळू शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण अकोल्यात भाजपचे वैभव पिचड हे कोल्हेंना मदत करत होते. प्रचारादरम्यान कोल्हेंच्या व्यासपीठावर पिचड हे आले होते. नगर जिल्ह्यातून कोल्हेंना काही महायुतीचे नेते आणि महाविकास आघाडीचा फुल सपोर्ट असल्याचे बोलले गेले. त्यात नाशिकमध्ये कोल्हे यांचे नातेसंबंध आहे. तेथील एका संस्थेने कोल्हेंना मदत केलेली आहे. विशेष म्हणजे नगरमधून शिक्षक असलेले भाऊसाहेब कचरे, अप्पासाहेब शिंदे यांनी शिक्षक बँकेच्या माध्यमातून राजकारण केले. परंतु दोघांना अत्यंत कमी मते मिळाली आहेत.

दुसऱ्या बाजूने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे दराडे यांचा विजय सुकर झाला आहे. कारण राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे हे नाशिक मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर विखे यांना आपल्या संस्थांमधील दहा हजार मते हे दराडे यांना मिळवून दिले. तेथेच दराडे हे विजयी झाले आहेत. एका अर्थाने कोल्हेंना पराभूत विखेंनी गणेश सहकारी कारखान्याच्या पराभवाचा वचपा काढला आहे.

दुध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 30 रुपयांचा भाव अन् 5 रुपये अनुदानही…

या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आघाडी धर्म न पाळल्यामुळे खासदार संजय राऊत आणि थोरात यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थोरात यांच्या या वागण्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पक्ष नेतृत्वाला बरोबर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवधनुष्य अधिक बळकट केले आहे.

सोशल मीडियावर कोल्हे, थोरातांवर निशाणा

कोल्हे पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियावर विखे समर्थकांकडून कोल्हे व बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध टीका-टिप्पणी केली जात आहे. एकाचा करेक्ट कार्यक्रम झालाय. दुसऱ्याचा म्हणजेच थोरात यांचा विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करू, असे पोस्ट आता सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. या पोस्ट विखे समर्थकांकडून फिरविल्या जात आहेत. एक विकेट पडली (कोपरगाव) दुसरीपण लवकरच पडेल (संगमनेर), जो हमसे टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, विखे पाटील पॅटर्न असा पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज