राधाकृष्ण विखे मुख्यमंत्री; शरद पवारांनी टाकला होता शब्द, अंकुशराव काकडेंचा मोठा खुलासा
Ankushrao Kakade on Vikhe Pawar : विखे आणि पवार ही राजकीय लढाई महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र, नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुशराव काकडे यांनी “लेट्सअप मराठी”शी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. (Vikhe Pawar) विखे आणि पवार यांच्यात राजकीय वैर आहे असं म्हणतात. परंतु, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शेवटच्या काळात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा होती. (Sharad Pawar) त्यावेळी शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. जर पवारांच्या मनात विखे यांच्याबद्दल आकस असता तर त्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली असती का? असा प्रश्न काकडे यांनी उपस्थित केला आहे.
नाव पुढं केलं असतं का? साखर वाटली, पावसात भिजले तरीही हरले.. सुजय विखेंच्या पराभवाची कारणं काय ?
त्याचबरोबर काकडे यांनी हा दावा आपण कुणाचं ऐकून नाही तर एका विवाहप्रसंगी आम्ही म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि मी सोबत होतो. त्यावेळी राधाकृष्ण विखे आपल्याला म्हणाले, की मला मुख्यमंत्री होण्याची संधी निर्माण झाली आहे. तसंच, यामध्ये मला शरद पवारांची साथ आहे. त्यांनी मी मुख्यमंत्री होण्यासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे असं स्वत: राधाकृष्ण विखे यांनी आपल्याला सांगितल्याचंही अंकुशराव काकडे यावेळी म्हणाले आहेत. तसंच, त्यांना पवारांनी असा शब्द दिला असेल तर त्यांच्या मनात विखेंबद्दल आकस कसा असणार असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
आकस नाही
विखे आणि पवार अस काही वैर असण्याचं कारण नाही. मात्र, बाळासाहेब विखे यांचा जो अपक्ष पराभव झाला तो त्यांच्या जिव्हारी लागला. कारण त्यावेळी थोरात, गडाख, विखे, राजळे अशी मात्तब्बर मंडळी राजकारणात होती. त्यामुळे तो पराभव झाला. ते त्यांच्या मनात असेल. पुढेही त्यांनी चांगल यश त्यांना मिळत गेलं. परंतु, याचा अर्थ पवारांच्या मनात विखेंबद्दल काही आकस आहे असा अर्थ काढणं चूक आहे असंही अंकुशराव काकडे यावेळी म्हणाले.
संघर्ष कायम ठेवला
शरद पवार यांनी राज्यात आपला राजकीय दबदबा निर्माण केला असला तरी त्याला अहमदनगर जिल्ह्यात काही मर्यादा आल्या. येथे विखे आणि पवार असा राजकीय संघर्ष उभा राहिला. तो आजही तिसऱ्या पिढीवर कायम आहे. यामध्ये समान धागा आहे तो सहकार क्षेत्राचा. सहकार क्षेत्राच्या माध्यामतून राजकारणात प्रस्थापित होणारे हे दोन कुटुंब आहेत. त्यामुळे कुणीतरी कुणाला कुठ थोफवल्याशिवाय राजकीय सत्ताकरण होणार नाही म्हणून हा संघर्ष कायम पेटता राहिला किंबहूना तो ठेवला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही तो दिसला. स्वत: राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांचा पराभव करत शरद पवारांचे उमेदवार निलेश लंके हे विजयी झाले.