Lok Sabha Election 2024 : आगामी काळात निवडणुका आहे (Lok Sabha Election 2024) त्याआधीच नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे युवानेते आणि जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. राळेभात यांनी भाजप नेते राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान येणाऱ्या काळातील निवडणुका पाहता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
येणाऱ्या काळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका या होणार आहे यामुळे सर्च पक्षांकडून पक्ष बांधणी तसेच संघटनांवर भर दिला जातो आहे. एकीकडे असे सुरु असताना कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला एक जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पवनराजे राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा चौंडी येथे पार पडला. भाजपच्या या मोहिमेमुळे राष्ट्रवादी अर्थात आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का बसला आहे.
Ram Shinde : रोहित पवारांची टीका झोंबली! राम शिंदेंनी MIDC चा हिशोबच मागितला
निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला खिंडार
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी राळेभात यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. राळेभात यांचा भाजपा प्रवेश आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा म्हणून राळेभात यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र राष्ट्रवादीला राम राम करत त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार असे चित्र निर्माण आले आहे. एकंदरीतच निवडणुकांपूर्वीच अशा या गळतीमुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.