Lok Sabha Election Politicians Hurry for lawns and Crowd : लोकसभा निवडणुकांचे ( Lok Sabha Election) बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे देखील जाहीर झाली आहे. उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली असून सभा, राजकीय कार्यक्रम यामाध्यमातून पुढाऱ्यांनी ( Politicians ) देखील पायाला भिंगरी लावली आहे.
Hardik Pandya : हार्दिकला टी 20 वर्ल्डकपसाठी एन्ट्री कठीण; ‘त्या’ बैठकीत नेमकं काय ठरलं?
मात्र सध्या लग्नाचा सिझन असल्याने लॉन्स, मंगल कार्यालये ( lawns ) ही आधीच बुक झालेली असतात. यामुळे आता राजकीय मंडळींना सभांसाठी लॉन्स बुकिंग करणे हे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा वाढू लागला असल्याने आयोजित सभांना नागरिकांची गर्दी ( Crowd ) जमावाने देखील मुश्किल होऊ लागले आहे.
त्यांना स्वतःच्या तालुक्याचा विकास जमला नाही ते… विखेंनी लंकेंना डिवचलं
एप्रिल व मे महिन्यातील तीत्र उष्णतेच्या लाटेमुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रचार सभेसाठी गर्दी जमवण्याचे आव्हान राहणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचा एसी हॉल, मैदाने, लॉन्स प्रचार सभेसाठी घेण्यावर भर वाढतो आहे. नगर दक्षिण व उत्तर लोकसभा मतदारसंघातील लॉन्स, हॉल लग्नसराईमुळे दोन महिन्यांपासूनच बुक असल्याने अनेक राजकीय पक्षांना लॉन्स, हॉल घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. नगर शहराचे तापमान चाळिशीला टेकण्याच्या उंबरठ्यावर आहे. उन्हाची तीव्रता पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना गर्दी जमवण्यासाठी सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान मतदार कडाक्याच्या उन्हामध्ये सभांना येण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता अखेर उमेदवारांनी ‘गावभेटी’ घेण्याची शक्कल लढवली आहे. विशेष म्हणजे तालुक्यांच्या ठिकाणी सभांचे आयोजन केले असता नियोजनकर्त्यांना सभांसाठी 200 ते 300 च्यावर लोक जमवणे शक्य होईना अशी अवस्था निर्माण झाली आहे. यातच या सभांसाठी होणारा खर्चही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी सभा न घेता ‘गावभेटी’ घेण्यास सुरुवात केली आहे.
प्रचार सभांसाठी धावाधाव
एप्रिल महिन्याच्या 18 तारखेपासून ते 25 एप्रिल पर्यंत उमेदवाराना अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे आगामी मे महिन्यामध्ये राजकीय प्रचार सभा होणार आहेत. राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडवणीस, शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभा घेण्यासाठी लॉन्स, हॉल ,छोटी मैदाने घेण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. लग्नसराईमुळे अनेक लॉन्स व हॉल अगोदरपासूनच बुक करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षांना प्रचारासाठी हॉल व लॉन्स घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.