त्यांना स्वतःच्या तालुक्याचा विकास जमला नाही ते… विखेंनी लंकेंना डिवचलं
Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतून उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यातच महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा मतदार संघाचा विकास कसा करणार? विश्वासघात करून त्यांचे राजकारण सुरू आहे. केवळ दहशत आणि दादागिरी करून सुरू असलेल्या राजकारणाला जनता कधीही स्विकारणार नाही अशा शब्दात खासदार सुजय विखे यांनी नाव न घेता निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
खा. डॉ. सुजय विखे पाटील हे कर्जत तालुक्यातील भांभोरा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आमदार राम शिंदे आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राम नवमीच्या निमित्ताने देशात प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना खा. विखे म्हणाले की, देशात राममंदिरासाठी 500 वर्षांचा संघर्ष झाला. या संघर्षात अनेकांचे जीव गेले. मात्र केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर राममंदिर पुर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. यासाठी न्यायालयातील लढाई सरकारने यशस्वी केली. यामुळे अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्णत्वास गेले. दादागिरी करणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही… विरोधी उमेवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत.
लोकसभा मतदार संघाचा विकास कसा करणार?
विश्वासघात करून त्यांचे राजकारण सुरू आहे. केवळ दहशत आणि दादागिरी करून सुरू असलेल्या राजकारणाला जनता कधीही स्विकारणार नाही. या भागातील जनता सुज्ञ आणि विचारी आहे. विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब करून लोकसभा मतदार संघातील जनता महायुतीच्या पाठीशी खंभीर उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा मतदार संघात मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर आपण नागरिकांकडे समर्थन मागत आहोत. या भागातील प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता केली.
आपल्याकडे केलेली विकासकामे सांगण्याचे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 10 वर्षात घेतलेल्या निर्णयांचे लोककल्याणकारी योजनांची माहिती आहे. बुथवरील प्रत्येक कार्यकर्त्याने लाभार्थी आणि मदतारांपर्यंत पोहचवायची आहे. नकारात्मक गोष्टीना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.