LokSabha Election Result Udayanraje Bhosale and Shahu Maharaj Chhatrapati win : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ( LokSabha Election ) सुरू आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे देशाच्या संसदेत राज्यातील दोन राजे पोहचले आहेत. कारण साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी विजय मिळवला आहे. तर तिकडे कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांनी देखील शिंदेच्या विद्यमान खासदाराला धुळ चारली आहे.
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…
त्यामुळे राज्यातील राजघराण्यातील दोन्हीही राजे आता लोकसभेत गेले आहेत. निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या प्रमाणे महायुतीने साताऱ्यात म्हटलं होत की, मान गादीला आणि मतही गादीला. तीच घोषणा महाविकास आघाडीने कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी दिली होती. तेथे देखील तसंच झालं मतदारांनी आपला कौल हा मान गादीला आणि मतही गादीलाच यानुसारच दिला आहे.
Kolhapur Loksabha : कोल्हापुरकरांचं छत्रपतींच्या गादीलाच मत! शाहु महाराज एक लाखांच्या लीडने दिल्लीत…
त्यामुळे ही राज्यातील राजघराण्यातील दोन्हीही छत्रपती एकाच वेळी संसदेत असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. कारण या अगोदर शाहू महाराज छत्रपती यांचे पुत्र असलेले संभाजीराजे आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे एकाच वेळी खासदार होते. राज्यसभेवर खासदार होऊन गेलेले आहेत. मात्र ते छत्रपती नव्हते. तर ते युवराज होते.
दरम्यान महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांनी चीतपट केलंय. उदयनराजे भोसले यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता, या पराभवाचा वचपा यंदाच्या निवडणुकीत उदयनराजेंनी काढलायं. उदयनराजे यांचा विजय होताच ते भावूक झाल्याचे दिसून आले. तर कोल्हापुरकरांनी छत्रपतींच्या गादीलाच मत देऊन पसंती दिली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहु महाराजांनी महायुतीचे उमदेवार संजय मंडलिक यांना चारीमुंड्या चीत करुन दिल्ली गाठलीयं.