Download App

विधानसभेला झटका ते शनिशिंगणापूर ट्रस्टमधील घोटाळा; शंकरराव गडाख आहेत कुठे ?

नेवासा तालुक्याच्या राजकारणातून सध्या माजी मंत्री शंकरराव गडाख अलिप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Ahilyanagar Politics : नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांना (Ahilyanagar Politics) जनतेने नाकारले. शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघेंकडून ते पराभूत झाले. तेव्हापासून शंकरराव गडाख हे मतदारसंघातून गायब आहेत. आता तर श्री क्षेत्र शनिशिंगणापूर ट्रस्टमधील एक-एक घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहे. हा घोटाळा थेट विधानसभेत गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूरच्या ट्रस्टच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वच विरोधक गडाखांवर ‘बाण’ सोडत आहेत. पण माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी एक ओळीचे प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे शंकरराव गडाख हे आहेत कुठे ? इतके गप्प का आहेत ? भविष्यात ते वेगळे राजकारण करणार आहेत हेच पाहूया…

2019 मध्ये अपक्ष लढले मंत्री झाले पण पराभवाचा झटका

2019 ला शंकरराव गडाख अपक्ष लढले आणि जिंकून आले. ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी आली होती. ठाकरेंनी त्यांना थेट धाराशिवचे पालकमंत्रीही केले होते. पण 2024 च्या निवडणुकीत गडाखांना धक्का बसला. शिवसेनेचे शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे यांच्यासोबत त्यांची लढत झाली. मंत्री राधाकृष्ण विखेंची ताकद लंघेंना मिळाली व कॅबिनेट मंत्री राहिलेले शंकरराव गडाख यांचा थोड्या मताने पराभव झाला. पराभवानंतर मात्र गडाख हे मतदारसंघातून जणू गायबच झाले असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांनासाठी नेहमीच अग्रेसर असलेले गडाख विधानसभेच्या निकालानंतर मतदारसंघात देखील तुरळक दिसू लागले. गडाख यांच्या शिक्षणसंस्था तसेच साखर कारखाना देखील असल्याने कारखान्याच्या कारभाराकडे त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

ब्रेकिंग : जयंत पाटलांचा अखेर राजीनामा; शशिकांत शिंदे शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

शंकरराव गडाख सत्तेत जाणार?

विधानसभेपूर्वी व विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी सत्ताधाऱ्यांकडे वाटचाल केली. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच ED यांच्या कारवायांमुळे सत्ताधाऱ्यांकडे ओघ वाढला. यातच पराभूत झालेले तसेच अनेकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाकडे पावले वळवली. यातच शंकराव गडाख यांना देखील शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली होती, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. गडाख हे सध्या सक्रिय राजकारणात दिसत नाही. मात्र येणाऱ्या काळात ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का अशी चर्चा रंगली आहे.

शिंगणापूर देवस्थानाच्या वादाच्या केंद्रस्थानी गडाख?

शिंगणापूरमधील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये अनागोंदी कारभार सुरू होता. खोटे अॅप बनवून कोट्यवधी रुपयांची भाविकांची लूट करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला . शनि चौथऱ्यावर टाकल्या जाणाऱ्या तेलातही भ्रष्टाचार झाला. तसेच कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेले रुग्णालय बंद आहे. कर्मचाऱ्यांची बोगस भरती केली गेली. गडाख यांच्याच कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचाराशी संबंध आहे. याबाबत नेवासा मतदार संघाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे.

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या भ्रष्टाचाराच्या मूळ केंद्रस्थानी माजी मंत्री शंकरराव गडाख असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले. त्यांना शनिदेवाचा पैसा पुरला नाही. त्यांनी शनिदेवाची झोळीत हात घातलाय, त्यांना ते भोगावे लागेल, असा टोला विखेंचा आहे. शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त वेगळे असले तरी त्यांचा कारभार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचा दावा आहे. निवडणुकी पराभवानंतर शनिशिंगणापूर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने शंकरराव गडाख हे विरोधकांच्या चक्रव्युहात अडकले आहेत. पण त्यावर ते सध्या चुप्पी साधून आहेत. त्यामुळे नेमकी गडाखांच्या मनात काय सुरू आहे प्रश्न उपस्थित केला जातोय.

“..तर तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल”, CM फडणवीसांच्या विश्वासू आमदाराला ठाकरेंची ऑफर

follow us