Download App

“संपर्क कमी पडतोय, जमिनीवर या”; विखेंच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच सुनावलं

सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार पाचपुते यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच खडसावले.

Ahmednagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत सुजय विखे यांचा निसटता पराभव झाला. मतदारसंघातील श्रीगोंदा तालुक्यातून त्यांना कमी लीड मिळालं. विशेष म्हणजे या तालुक्यात भाजपचेच बबनराव पाचपुते आमदार. तरीदेखील विखेंना पाहिजे तितका लीड मिळवून देऊ शकले नाहीत. उलट याच तालुक्यानं निलेश लंकेंना भरभरून मतदान केलं. परिणामी त्यांचं मताधिक्य चांगलं राहिलं. या घडामोडीत नेमकं चुकलं कुठं? आपण कुठं कमी पडलो? यावर चिंतन करण्यासाठी आमदार पाचपुतेंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. पण, या बैठकीत भावना अनावर झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट आमदार पुत्र विक्रमसिंह आणि प्रतापसिंह पाचपुते यांना चार शब्द सुनावले.

“तुम्हा दोघा भावांचा संपर्क कमी पडतोय लोकांचे फोन उचलत जा. आगामी विजयासाठी दोन्ही भावांनी जमिनीवर राहूनच लढ्याचं नेतृत्व करावं”, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाशकात तिरंगी, मुंबई-कोकणात मविआ-महायुती भिडणार; माघारीनंतर लढती स्पष्ट

लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणेसह शिर्डीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. नगर दक्षिणमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे बनलेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला. धक्कादायक बाब म्हणजे विखे यांना अपेक्षित होते तितके लीड श्रीगोंद्यातून मिळाले नाही. दुसरीकडे लंके यांना या मतदारसंघाने तारले. यामुळे निवडणुकीत कोणते गणित चुकले, आपण कुठे कमी पडलो याबाबतची चर्चा करण्यासाठी आमदार पाचपुते यांनी कार्यकर्त्यांची एक चिंतन बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले आमदार बबनराव पाचपुते यांनी राजकारणात जो प्लॅटफॉर्म तयार केला त्यावर आता तुम्हाला गाडी चालवायची आहे. प्रतिभा पाचपुते यांचा जनसंपर्क आहे मात्र तुम्ही दोघे भाऊ कुठेतरी कमी पडत आहात. तुम्ही फोन उचलत नाही अशा तक्रारी आहेत. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत तर विजय देखील आपलाच आहे. मात्र तुम्हा दोघा भावांना जमिनीवर राहूनच लढाईचं नेतृत्व करावं लागणार आहे, अशा परखड शब्दांत कार्यकर्त्यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्यासमोरच त्यांच्या दोन्ही पुत्रांची चांगलीच कानउघाडणी केली.

Maharashtra Politics : लोकसभेनंतर फासे फिरले; राज्यातील आमदारांना मंत्रिपदात ‘नो इंट्रेस्ट’

पाचपुतेंच्या बैठकीकडे विखे समर्थकांची पाठ

जोरदार प्रचार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सर्वांना सोबत घेत सभा घेतल्या तरी देखील सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. धक्कादायक बाब म्हणजे श्रीगोंद्यामधून सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले नाही. श्रीगोंद्यात भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आहेत. राजकारणातील दिग्गज नेते म्हणून पाचपुतेंची ओळख आहे. मात्र असे असतानाही श्रीगोंद्यामधून विखे यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळाले. यामुळे नाराज झालेल्या विखे समर्थकांनी पाचपुते यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली.

follow us

वेब स्टोरीज