Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नुकतेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना (Nilesh Lanke) उमेदवारी जाहीर झाली आहे. नगर दक्षिणेत आता सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे. मात्र उमेदवारी जाहीर होताच लंके यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. विखेंचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेले थोरात यांची लंके यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दोघांमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते आहे. दरम्यान नगर दक्षिणच्या निवडणूकीत पुर्ण शक्तिनिशी पाठीशी राहण्याची ग्वाही यावेळी थोरात यांनी लंके यांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने आपली लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये नगर दक्षिणेमधून निलेश लंके यांना तिकीट मिळाले. उमेदवारी जाहीर होताच लंके यांनी थेट शनिवारी रात्री उशीरा संगमनेर गाठले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी लंके म्हणाले, थोरातांचे नेहमीच मार्गदर्शन हे मला लाभत असते.
मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी; पवार गटाची पहिली यादी जाहीर
विधानसभेतदेखील माझ्यासारख्या नवख्या आमदाराला त्यांनी सतत सहकार्य केले. उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेण्याच्या उद्देशाने संगमनेर गाठले. यावेळी थोरात यांनी देखील नगर दक्षिणच्या निवडणूकीत पुर्ण शक्तिनिशी पाठीशी राहण्याची ग्वाही लंके यांना दिली. ही निवडणूक श्रीमंतांच्या विरोधात गरीब जनता अशी होणार असून या लढ्यात गोरगरीब जनता जिंकणार आहे, असे उद्गार थोरात यांनी काढले.
नगर दक्षिणेत विखे विरुद्ध लंके
नगर दक्षिणेमध्ये महायुतीकडून सुजय विखे यांची उमेवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे आमदार निलेश लंके यांनी जनसंवाद मेळावा कार्यक्रम घेत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून ते लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहे. लंके यांची उमेदवारी आता जाहीर झाली असल्याने नगर दक्षिणेमध्ये लंके विरुद्ध विखे असा सामना रंगणार हे मात्र नक्की.
निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार? पवारांनी अखेर सांगूनच टाकलं