Download App

‘त्यांचा पक्षांतराचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला ठाऊक’; विखेंच्या आरोपांवर पवारांचा सणसणीत टोला

Sharad Pawar replies to Radhakrishna Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगर शहरात आहेत. काल शहरातील गांधी मैदानात त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि जिल्ह्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत विखे यांनी केलेल्या आरोपांवर थेट उत्तरे दिले.

शरद पवार यांनी आज सकाळीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले. काही दिवसांपूर्वी विखे म्हणाले होते, की शरद पवार नगर जिल्ह्यात आले नसते तर आश्चर्य झाले असते. ते नगरमध्ये येत आहेत यात काही नाविन्य नाही. विखेंविरोधात प्रचार हाच त्यांचा धर्म आहे. शरद पवारांनी जिल्ह्यातील नेत्यांत भांडणं लावली. जिल्ह्याचं वाटोळं केलं असे आरोप राधाकृष्ण विखे यांनी केल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर शरद पवारांनीही अगदी निवडून उत्तरं दिली.

Sharad Pawar: तर पाणी मिळणार नाही’ बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी

पवार म्हणाले, ज्या नेत्यांचा उल्लेख तुम्ही केला त्यांच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. विखेंविरोधात प्रचार हा त्यांचा धर्म असल्याची टीका राधाकृष्ण विखेंनी केली होती. ते काय बोलतात हे मला माहिती नाही. कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता तर भाजपमध्ये आहेत. आता हा त्यांचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला.

भाजपने यंदा चारशे पारचा नारा दिला आहे त्याबाबत काय वाटतं, या प्रश्नावर पवार म्हणाले, मला भाजपाचा नारा चुकीचा वाटतो. लोकसभेची सदस्य संख्या 543 आहे जर त्यांनी 543 चा नारा दिला असता तर मी आधिक खरा मानला असता. देशात पहिल्या टप्प्यातील मतदान काल झालं. यात महाराष्ट्रात खूप कमी मतदान झालं. यावर शरद पवार यांनी खंत व्यक्त केली.  कडाक्याचा उन्हाचा तर परिणाम आहेच तसेच मतदान करण्यात लोकांची उदासिनता का आहे याचा राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला खोलात जाऊन विचार करावा लागेल.

अमित शाह भाषणात माझ्याकडे दहा वर्षांचा हिशोब मागतात पण,  2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात मी सत्तेत नव्हतो. ते सत्तेत होते. त्यामुळे मी दहा वर्षांत काय केलं याऐवजी त्यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात काय केलं याचं उत्तर दिलं पाहिजे. ही जबाबदारी आमची नाही. याआधी मी सत्तेत असताना माझ्याकडे कृषी खात्याची जबाबदारी होती. माझ्या कार्यकाळात मी काय केलं हे सगळ्या जगाला माहिती आहे, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

 

follow us