Sushma Andhare : नगर शहरातील वाढत्या ताबेमारी आणि गुंडगिरीविरोधात खासदार संजय राऊत यांनी नगरमध्ये येऊन शिवसेना संघर्ष करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे नगरमध्ये येत या ताबेमारीवर जोरदार हल्लाबोल केला. नगर शहरात वाढत्या ताबेमारीवर बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, शिवाजीराव कर्डिले असतील जगताप असतील किंवा विखे असतील एकत्रित अहवाल पाहिला असता एकच आढळून येते ते म्हणजे ताबेमारी. मोकळ्या प्लॉटवर ताबे मारून गोरगरिबांना लुटण्याचा प्रकार सध्या नगरमध्ये सुरू आहे. राजकीय व्यक्तींकडून आता प्रयत्न केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. तक्रारदारांना एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा देखील यावेळी अंधारे यांनी दिला.
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रेचे आज नगर शहरात आगमन झाले. यावेळी पत्रकार परिषदेत अंधारे यांनी नगर शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने ताबेमारीच्या विषयावरून लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील नगरमध्ये आले असता त्यांनी देखील ताबेमारीचा प्रश्न उपस्थित केला होता.
महायुतीचे सरकार येताच गुंडाराज; नगरमध्येही ताबेमारी, गुंडगिरी’ NCP आमदार राऊतांच्या निशाण्यावर
अंधारे म्हणाल्या, आम्ही राज्यातील विविध ठिकाणी फिरत आहोत लोकांचे प्रश्न जाणून घेत आहोत मात्र नगर शहरात आले असता आम्हाला प्रामुख्याने ताबेमारीचा गंभीर विषय जाणवला. नगर शहरात ताबेमारीचे प्रमाण वाढत चालले आहे. कर्डिले असो किंवा जगताप असो किंवा विखे यांचा अहवाल पाहिला असता याचा एकत्रित परिणाम म्हणजे नगर शहरातील वाढलेली ताबेमारी. दिसेल त्याच्या प्लॉटवर ताबा मारणे आणि गोरगरिबांना लुटण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. राज्यातील विविध ठिकाणी फिरलो असता लोकांच्या वेगवेगळ्या समस्या होत्या. शैक्षणिक, शेतकीय समस्या होत्या. मात्र नगरमध्ये ताबेमारीच्या समस्या दिसून आल्या.
अनेक लोकांनी कागदोपत्री देखील समस्या मांडल्या आहेत. तक्रारदारांना आश्वासन देताना अंधारे म्हणाले की आचारसंहिताला वेळ असेल तर पूर्वी मी या सर्व तक्रारदारांना एकत्रित करून नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढला जाईल. यावर चर्चा केली जाईल असे आश्वासन यावेळी अंधारे यांनी दिले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारणी करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला जात नसल्याच्या देखील तक्रारी मिळाल्याचे अंधारे म्हणाल्या. ठेकेदार आहेत त्यांचे थेट संबंध या राजकीय व्यक्तींशी असल्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, असे अंधारे म्हणाल्या.