Sushma Andhare : ‘पोलीस स्टेशन अन् तारीख तुम्हीच सांगा, मी अटक व्हायला तयार’; अंधारेंचे देसाईंना चॅलेंज!
Sushma Andhare : ड्रग्समाफिया ललित पाटील प्रकरणात (lalit Patil Drugs Case) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाक् युद्ध वाढतच चालले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अंधारे यांनी केली होती. तर त्याला प्रत्युत्तर देत देसाई यांनी अंधारेंविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आणखी आक्रमक होत अंधारे यांनी थेट आव्हान दिले आहे. पोलीस स्टेशन तुम्ही सांगा, अधिकारीही तुमच्याच मर्जीतील घ्या, वेळ आणि तारीख तुम्हीच सांगा, माझी अटक व्हायला यायची तयारी आहे. कारण माझी लढण्याची तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या दोन्ही मंत्र्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंत्री देसाई यांनी उत्तर देत अंधारेंवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. या घडामोडींनंतर अंधारे यांनी पु्न्हा एकदा देसाई यांनी निशाण्यावर घेतले आहे.
‘मविआ’च्या काळात सचिन वाझे कुठं फिरत होते? विखेंचा राऊतांना थेट सवाल
दबावतंत्राचा वापर करून मला घाबरवू शकतील असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. अशा पद्धतीने करोडो रुपयांच्या ड्रग्सचे व्यवहार होत असतील तर राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? आणि असेल तर इतक्या करोडो रुपयांचे व्यवहार कसे होतात? असा सवाल अंधारे यांनी केला. एल्विश यादव (Elvish Yadav) मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आरती करायला जातो आणि रेव्ह पार्टी प्रकरणात त्याच्यावर कारवाई होते. या सगळ्या गोष्टी चक्रावून टाकणाऱ्या आहेत. आम्ही गृहमंत्र्यांना प्रश्न विचारत आहोत. प्रश्न विचारणं गुन्हा असेल आणि त्याची शिक्षा म्हणून देसाईंसारखे मंत्री कारवाई करण्याचे प्रयत्न करत असतील तर पोलीस स्टेशन तुम्ही सांगा. वेळ आणि तारीखही सांगा माझी अटक होण्याची तयारी आहे. कारण, माझी लढण्याची तयारी आहे, असे आव्हान अंधार यांनी दिले.
शंभूराज देसाईंवरील आरोपांमुळे अंधारे कायद्याच्या कचाट्यात; आधी नोटीस आता पोलिसात तक्रार
आधी नोटीस आता थेट पोलिसांत तक्रार
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपावर शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी माझ्यावर केलेले आरोप मागे घ्यावेत, असे देसाई म्हणाले होते. परंतु सुषमा अंधारे या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्याने त्यांचे विधान मागे घेतले नाहीत. त्यामुळे मंत्री देसाई यांनी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आता अंधारेंविरुद्ध कार्यकर्त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच अंधारे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.