Sangamner News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Elections Commissions) प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात हवाल्याची 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections) अनुषंगाने जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्ता बाळगणार्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की संगमनेरमध्ये दोघे जण त्यांच्या साथीदारासह आपले उत्पन्नापेक्षा जास्त रोख रक्कम बेकायदेशीरपणे बाळगून हवालामार्फत विल्हेवाट लावत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील तुषार धाकराव व पोलीस अंमलदार अतुल लोटके, अमृत आढाव, मनोज गोसावी, रमीजराजा आत्तार यांचे तपास पथक नेमून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
Pune Police : पुण्यात पोलीस असुरक्षित? कोयत्या गँगकडून चक्क पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
तपास पथकाने संगमनेर शहरात छापा टाकला दोघेजण मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुकेशकुमार रमेशभाई पटेल व धवलकुमार जसवंतभाई पटेल( दोघे रा. संगमनेर मूळ राहणार गुजरात) असे सांगितले. पंचासमक्ष त्यांच्या कब्जात असलेल्या रोख रकमेबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम हवाल्याची असून ही रक्कम भावेश रामाभाई पटेल आणि आशीष सुभाष वर्मा यांची असल्याचे सांगितले.
तपास पथकाने अधिक चौकशी केली असता मुकेशकुमार रमेशभाई पटेल व धवलकुमार जसवंतभाई पटेल यांचेकडे असलेली रक्कम ही त्यांनी बेकायदेशीर मार्गाने जमवून शासनाचा कर चुकवून स्वत:चे फायद्याकरता हवाल्यामार्फत विल्हेवाट लावण्याकरीता मिळून आल्याची खात्री झाली. त्यानंतर पंचांसमक्ष मुकेशकुमार रमेशभाई पटेलकडून 40 लाख 26 हजार रूपये रोख रक्कम व धवलकुमार जसवंतभाई पटेलकडून 1 लाख 89 हजार रूपये असे एकूण 42 लाखल 15 हजार रूपये हस्तगत करण्यात आले.
Ahmednagar Police : नगरमधील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा..थेट गृहमंत्र्यांना निवेदन