Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार कमबॅक (Maharashtra Rain Update) केले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. विदर्भात मात्र उन पावसाचा (Heavy Rain) खेळ सुरू आहे. दरम्यान आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. पाऊस होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. ज्या भागात पेरण्या झाल्या पण पावसाची प्रतिक्षा आहे अशा भागातही पाऊस हजेरी लावणार आहे.
आज तळकोकणास थेट विदर्भापर्यंत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागात स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुसळधार पावसाचा कहर! मृतांचा आकडा 30 पार, 80 हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर
कालपासून राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या भागात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. धाराशिवमध्ये सर्वाधिक 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.
पुढील 4 दिवस महत्वाचे! राज्यात मुसळधार पावसाचा कहर, 10+ जिल्हे हाय अलर्टवर