Download App

मोठी बातमी! उत्कर्षा रुपवतेंच्या वाहनावर दगडफेक; हल्लेखोर पसार, पोलिसांत तक्रार

शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.

Shirdi Lok Sabha Election : राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरू असतानाच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Election) धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटोपून परतत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक केली. यानंतर हल्लेखोर पसार झाले. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. या दगडफेकीत वाहनाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

ठरलं..! उत्कर्षा रुपवते आज भरणार उमेदवारी अर्ज; वंचित आघाडीची शिर्डीत एन्ट्री

उत्कर्षा रुपवतेंच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा ठीकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. अकोले पोलिसांकडून सदर घटनेचा तपास केला जात आहे. पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते. मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही. राजकीय कारण की दुसरं काही कारण याचा शोध आता अकोले पोलीस घेत आहेत.

शिर्डी लोकसभेच्या वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या प्रचार दौरा आटोपून संगमनेरकडे परतत होत्या. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. पण कारचालकाने प्रसंगावधान राखत कार थांबवली नाही. त्यामुळे या हल्ल्यातून उत्कर्षा रुपवते थोडक्यात वाचल्या. यानंतर अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले.

या हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा मतदारसंघातून तीव्र निषेध केला जात आहे. या हल्ल्यामागे राजकीय कारण की दुसरं काही कारण याचा शोध आता अकोले पोलीस घेत आहेत. हल्लेखोर ताब्यात आल्यानंतरच हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल.

Bhausaheb Wakchaure : निवृत्त अधिकारी ते शिर्डीचा माजी खासदार, ठाकरेंचे ‘भाऊसाहेब’ कोट्याधीश..  

दरम्यान,  शिर्डी मतदारसंघात उत्कर्षा रुपवतेंना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तर महायुतीने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना तिकीट दिलं आहे. या दोन्ही प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात रुपवते निवडणुकीत उभ्या आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी प्रचार सभा, मेळावे आणि रॅलींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

follow us