Download App

मतदानाच्या दिवशी बरसणार ‘अवकाळी’; नगर-पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट

हवामान विभागाने पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात आज यलो अलर्ट आहे तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Weather Update : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी (Weather Update) अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. या पावसामुळे उन्हाळ्यातील तापमानात घट झाली आहे. परंतु हा पाऊस शेतीपिकांना मारक ठरला आहे. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही अडचणीचा ठरू लागला आहे. राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आता या मतदानात पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात आज यलो अलर्ट आहे तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, काल शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही पावसाने जोरदार बॅटिंग केली मग उमेदवारांनीही या पावसाचा विचार न करता पावसातच भाषणे ठोकली.

Weather Update : अवकाळीचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

अवकाळीने उडाली दाणादाण, शेती पिकांचे नुकसान

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वारा आणि पावसाने फळबागांचे मोठे नुकसान केले. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि हिंगोली जिल्ह्यात तुफान पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालु्क्यातील ऊस, दोडका, भोपळा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. बारामती तालु्क्यातील बाबुर्डी परिसरात काल सायंकाळी तुफान पाऊस कोसळला. गावातील चार घरांचे पत्रे उडून गेले. त्यामुळे घरातील साहित्य आणि धान्य भिजले. वादळी वाऱ्याने झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा ठप्प झाला होता.

आज आणि उद्या मुंबई, पु्णे, रायगड, नगर आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, सोलापूर, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, बीड, गडचिरोली, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वातावरणात मोठा बदल

मतदानाच्या दिवशीच पावसाचा खोडा

राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यातील पुणे आणि नगर जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदूरबार आणि बीड जिल्ह्यात हलका पाऊस होईल. ठाण्यात आज यलो अलर्ट दिला आहे. तसेच मुंबई शहरातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

follow us

वेब स्टोरीज