Manoj Jarange : तुला अक्कल होती तर जेलमध्ये कशाला गेला…जरागेंनी भुजबळांना डिवचले

Manoj Jarange : मराठा आऱक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आवाज पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. त्यापूर्वी श्रीगोंद्यामध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. भुजबळांनी तीन वेळेस आपले आरक्षण घातले आहे. आता पुन्हा जर प्रयत्न केला तर मी मंडळ आयोगला चॅलेंज करणार. आम्हाला असे करायचे नव्हते. मात्र आमचा नाईलाज […]

"येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? तुझी नियत.." जरांगेंचा भुजबळांरवर पुन्हा हल्लाबोल

"येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? तुझी नियत.." जरांगेंचा भुजबळांरवर पुन्हा हल्लाबोल

Manoj Jarange : मराठा आऱक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आवाज पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. त्यापूर्वी श्रीगोंद्यामध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. भुजबळांनी तीन वेळेस आपले आरक्षण घातले आहे. आता पुन्हा जर प्रयत्न केला तर मी मंडळ आयोगला चॅलेंज करणार. आम्हाला असे करायचे नव्हते. मात्र आमचा नाईलाज आहे. ते माझी माझी अक्कल काढतायत, जर तुम्हाला एवढी अक्कल होती तर जेलमध्ये कांदे खायला गेला कशाला? असा सवाल जरांगे यांनी केला.

>लोकसभा निवडणुकीपूर्वीच CAA ची अंमलबजावणी होणार! अमित शहांची सर्वात मोठी घोषणा

तसेच स्वतःबरोबर कुटुंबाचे वाटोळं केलं आणि आता समाजाचा वाटोळ करायला निघाले अशा शब्दात जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या या उपोषणाची लढाई आज म्हणजेच शनिवार रोजी सुरु झाली आहे. सरकारने काढलेला आदेश कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी ही मागणी जरांगे यांनी केली आहे. तत्पूर्वी श्रीगोंदा येथे त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना जरांगे यांनी भुजबळांवर कडाडून टीका केली.

Saif Ali Khan: ‘सैफ अली खानच्या मुलाला व्हायचंय….’; अभिनेत्याने थेटच सांगून टाकलं

जरांगे म्हणाले, आम्ही शांततेत मुंबईला गेलो आणि शांततेमध्येच आरक्षण घेऊन आलो आहे काहीजण आरोप करताय मुंबईला जाऊन त्यांना काहीच भेटलं नाही होय त्यांचं खरं आहे त्यांनाच काही भेटलं नाही. जे असे आरोप करत आहे त्यांना पद आणि पैसे हवे आहेत ते त्यांना भेटले नाहीत. मराठ्यांच्या जीवावर जगणारी ही अवलाद आहे त्यांनी आता शांत बसावं, अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

जेलमध्ये कांदे खायला गेला कशाला?

यावेळी मंचावरून भाषण करताना जरांगे यांनी म्हंटले कि, भुजबळांनी आजवर तीनदा आपले आरक्षण घालवले आहे. आता देखील ते तोच प्रयत्न करत आहे मात्र असे झाले तर आता मी मंडळ आयोग चॅलेंज करणार. आम्हाला असे काही करायचे नव्हते मात्र आमचा नाईलाज आहे. ते सतत माझी अक्कल काढत असतात. मात्र त्यांना जर एवढी अक्कल होती तर जेलमध्ये कांदे खायला गेले कशाला? स्वतःबरोबर कुटुंबाचे वाटोळं केलं आणि आता समाजाचा वाटोळ करायला निघाला आहे अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली.

Exit mobile version