Download App

Manoj Jarange : ‘तू कुठं भाजी विकत होता, महाराष्ट्र सदनाचा पैसा’.. एकेरीवर येत जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.

चार दिवसांपूर्वी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभा झाली. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत टीका केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर टीका करण्याचा सपाटा सुरू केला आहे. काल मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता सडकून टीका केली.

भुजबळांनी डिवचलं तर जरांगेंनीही सुनावलं; ‘म्हातारं’ म्हणत केला एकेरी उल्लेख

तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचं काय करत होतास. मुंबईत काय-काय केलं. कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलं याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हे देखील मला माहिती आहे. तू महाराष्ट्रातल्या जनतेचं खाल्लंस. महाराष्ट्र सदनाचा पैसा खाल्ला. महाराष्ट्र सदनाचा पैसा हा राज्यातील जनतेचा होता. तो पैसा तू खाल्लास. त्यामुळे तुला जनतेचा, गोरगरिबांचा तळतळाट लागला. म्हणूनच तू तुरुंगात गेला अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

‘म्हातारं’ म्हणतंय मला वाचता येत नाही 

मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील सभेतही छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हातारं म्हणतंय की, मला वाचता येत नाही. मला अभ्यासाची गरज असल्याचं ते म्हणतंय. आरक्षणाचा आणखी अभ्यास करावा लागणं असंही म्हणतंय. मराठ्यांचं लेकरु म्हणून लढलो अन् आरक्षण आणलं मराठ्यांनी हे महत्वाचं. वाचतो कव्हर तूच एकटा वाचित बस, मध्ये वाच आत्ता बाहेर आल्यावरही वाच… या शब्दांत जरांगे पाटलांनी भुजबळांना सुनावलं.

Chhagan Bhujabl : मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही; रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांवर भुजबळांचं प्रत्युत्तर

आम्हाला फक्त आरक्षण हवंय मग ते वाचून असो किंवा कसंही असो. अभ्यास करा असं तुमचं म्हणणं असेल तर मला वेळ नाही अभ्यास करायला, कुठं अभ्यास करितो तूच अभ्यास करीत बस. तू लिहित बस एखादी स्टोरी अन् एखादा पिक्चर पाहिला असेल तर आता डबल एखादी स्टोरी लिही त्यात भूमिकाही तुम्हीच कर, माझ्या मागे लागल्यावर मी सोडीत नसतो, असा इशाराही मनोज जरांगेंनी या सभेत दिला

Tags

follow us