भुजबळांनी डिवचलं तर जरांगेंनीही सुनावलं; ‘म्हातारं’ म्हणत केला एकेरी उल्लेख

भुजबळांनी डिवचलं तर जरांगेंनीही सुनावलं; ‘म्हातारं’ म्हणत केला एकेरी उल्लेख

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी-मराठा वाद चांगलाचं पेटल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या(Manoj Jarange Patil) सभेला उत्तर देण्यासाठी जालन्यात ओबीसी समाज एकवटला होता. या मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंना कुठूनच सोडलं नसल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या मनोज जरांगे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. ठाण्यात आज मनोज जरांगे यांची तोफ धडाडली आहे. या सभेत मनोज जरांगे पाटलांनी डिवचलेल्या भुजबळांचा एकेरी उल्लेख करीत कडक शब्दांत सुनावलं आहे.

Tiger च्या तिन्ही चित्रपटांमुळे माझं करिअर… टायगर 3 निमित्त सलमानने व्यक्त केल्या भावना

मनोज जरांगे म्हणाले, ते म्हातारं म्हणतंय की, मला वाचता येत नाही. मला अभ्यासाची गरज असल्याचं ते म्हणतंय. आरक्षणाचा आणखी अभ्यास करावा लागणं असंही म्हणतंय. मराठ्यांचं लेकरु म्हणून लढलो अन् आरक्षण आणलं मराठ्यांनी हे महत्वाचं. वाचतो कव्हर तूच एकटा वाचित बस, मध्ये वाच आत्ता बाहेर आल्यावरही वाच… या शब्दांत जरांगे पाटलांनी भुजबळांना सुनावलं आहे.

Chhagan Bhujabl : मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही; रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांवर भुजबळांचं प्रत्युत्तर

तसेच आम्हाला फक्त आरक्षण हवंय मग ते वाचून असो किंवा कसंही असो. अभ्यास करा असं तुमचं म्हणणं असेल तर मला वेळ नाही अभ्यास करायला, कुठं अभ्यास करितो तूच अभ्यास करीत बस. तू लिहित बस एखादी स्टोरी अन् एखादा पिक्चर पाहिला असेल तर आता डबल एखादी स्टोरी लिही त्यात भूमिकाही तुम्हीच कर, माझ्या मागे लागल्यावर मी सोडीत नसतो, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.

भारतीयांची खिलाडू वृत्तीला तिलांजली! सणसणीत टीका करत ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रेक्षकांना ठरविले ‘खलनायक’

ओबीसी मेळाव्यात आलेल्या इतर नेत्यांचा दोष नाही. एकटा म्हातारं तिकडं गेला होता मी कोणाचं नाव घेत नाही त्याची लायकी नाही आधी होती आता नाही. कायदा पायदळी तुडवला आणि जातीय तेढ निर्माण होणारं वक्तव्ये केल्याने मराठ्यांनाही त्याचा विरोध आहे, तुम्ही पातळी सोडल्याने आम्ही महत्वचं देत नाहीत. मराठा आरक्षण असतानाही तुम्ही देऊ नका म्हणतायं आमच्या नजरेतून तुमचा विषय संपला, असल्याचंही ते म्हणाले आहेत.

अनुभवी माणसापेक्षा रानात काम केलेला बरा :
मराठे आता एक झाले आहेत. किती सभा घ्यायच्या असतील तेवढ्याही घ्या. ओबीसीमधील अर्धे नेते फुटलेत.
इतक्या वर्षाचा अनुभव असलेला माणूस असा वागतोच कसा मी रानात काम केलेला बरा आहे, म्हातारपणात पचत नाही. सात ते आठ वेळा जावंच लागतं कारण लोकांचं खाल्ल तर पचन कसं, त्यांनी शांत रहावं नाहीतर कायम बाथरुममध्येच रहावं लागण, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube